Yavatmal पंचनाम्याचे सोंग थांबवा, तातडीची मदत द्या- देवानंद पवार - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, July 26, 2023

Yavatmal पंचनाम्याचे सोंग थांबवा, तातडीची मदत द्या- देवानंद पवार


 (APALA VIDARBH LIVE यवतमाळ प्रतिनिधी अयाज काजी)

वतमाळ अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्हयातील शेतक-यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जिल्हयात सर्वदूर कापूस, सोयाबिन सह सर्वच पिके खरडून गेली आहे. हजारो हेक्टर जमीन पीक घेण्यासारखी राहीलेली नाही. त्यामुळे सरकारने पंचनाम्याचे सोंग न करता तातडीने मदत देण्याची मागणी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी केली आहे.

देवानंद पवार यांनी आज यवतमाळ तालुक्यातील यावली इजारा तसेच घाटंजी तालुक्यातील सावंगी, ठाणेगार, गणेरी, मंगी, भीमकुंड इत्यादी ठिकाणी भेटी देऊन  नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. सन 2006, 2012 नंतर आता 2023 मध्ये एवढा भयंकर पाऊस पडल्याचे नागरीक सांगत आहे. काही जनांच्या मते तर गेल्या 40 वर्षात प्रथमच असा पाऊस पडला. या पावसाने हजारो हेक्टर जमीन खरडून गेली. ही जमीन आता पीक घेण्याच्या दर्जाची राहीलेली नाही. एखाद्या प्रकल्पात जमीन गेल्यास ज्या पध्दतीने सरकार शेतक-यांना मोबदला देते आता तशाच पध्दतीचा मोबादला जमीन खरडून गेलेल्या शेतक-यांना देण्याची मागणी देवानंद पवार यांनी केली आहे. 

यवतमाळ जिल्हयात फक्त चार ते पाच तासात जवळपास अडीचशे मीमी पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पुर येऊन हजारो घरे वाहून गेली. मोठया प्रमाणात शेती साहित्य, खते, किटकनाशके वाहून गेल्याने शेतकरी उदध्वस्त झाला आहे. केन्द्र तसेच राज्य सरकार मात्र अशाही परिस्थितीत गंभीर नाही. या पावसामुळे शेतक-यांचा खरीप हंगाम पाण्यात गेला आहे. त्यामुळे मंत्री तसेच सरकारी यंत्रनेने कोरड्या भेटी आणि नुसतीच सात्वना न देता तातडीची मदत देण्याची मागणी देवांनद पवार यांनी केली आहे. एकटया यावली परीसरात 90 घरांची पडझड तसेच अनेक जनावरे दगावली आहे. याशिवाय शेकडो एकर शेती खरडून गेली. शेतशिवारात जाणा-या रस्त्यांची अक्षरशा चाळणी झालेली आहे. ज्या घरांची पडझड झाली ती घरे राहण्यायोग्य राहीलेली नाही. त्याठिकाणी दुर्गंधी सुटलेली आहे. अशा वेळी सरकार तातडीची मदत देण्याएैवजी पंचनाम्याचे सोंग करीत आहे. राज्य शासन म्हणते प्रत्तेकी कुटूंबाला दहा हजाराची तातडीची मदत देऊ परंतु फुटकी कवडीही न मिळाल्याने नागरीकांत संताप व्यक्त केला जात असून त्यांच्यात रोष निर्माण झाला आहे. सरकारने नागरीकांच्या संयमाचा अंत न बघता तातडीने मदत द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा देवानंद पवार यांनी दिला आहे. या भेटी प्रसंगी त्यांच्यासोबत कॉग्रेसचे चंद्रशेखर चौधरी, शैलेश इंगोले, प्रा. विठ्ठल आडे, शालीकबाबू चवरडोल, किरण कुमरे, बंडू जाधव, डॉ. संदीप तेलगोटे, संजय वाळके, तसेच शेतकरी प्रकाश राठोड, विठ्ठल जाधव, बाळु चव्हाण, पातालबंसी, मोहण डडमल, कांतीराम चव्हाण उपस्थित होते.   


 



Post Top Ad

-->