संतनगरी शेंगाव येथील रेल्वे स्टेशन येथे अमृत भारत योजने अंतर्गत बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील श्रीसंत शेंगाव रेल्वे स्टेशन च्या सर्वागीण विकासासाठी शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्या अथक प्रयत्नातून २८ कोटी ८८ लक्ष रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला.
केंद्र सरकारच्या वतीने अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या शेंगाव रेल्वे स्टेशनचे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन झाले.बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या कायापालटाची आज खऱ्या अर्थाने पायाभरणी झाली.
विकास कांमामुळे विदर्भ पंढरी शेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला असून,जिल्हावासीयांसह रेल्वेप्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यावेळी आ.आकाश फुंडकर,आ.वसंत खंडेलवाल,शिवसेना जिल्हाप्रमुख मा.शांताराम दाणे,भाजपचे नेते शरद अग्रवाल व अन्य शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.