बुलढाणा राष्ट्रीय लहूशक्ती च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मेहकर व लोणार तालुक्यातील विवीध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी वंचित उपेक्षित समाजाचे लोकनेते राज्यमंत्री स्व मधुकरराव कांबळे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली व समाजात एकमेव अभ्यासू नेतृत्व हे आज आपल्या मधून निघून गेल्याची भावना खंत आज समाजातून ऐकण्यात येत होती. व समाज बांधव यांना अक्षरशः ही बातमी कळताच अश्रू अनावर झाले, मा साहेब हे आपल्या चिरंतर लक्षात राहतील असा नेता पुन्हा होणे नाही. अशी समाजाच्या आरक्षण वर्गीकरण संदर्भात मा कांबळे यांची भूमिका समाजा प्रती असलेली त्यांची तळमळ पाहून आमच्यातील कार्यकर्ता जागृत झाल्याची भावना अनेक ठिकाणी गावोगावी कार्यकर्ते यांनी मांडली. मातंग समाजाच्या समस्या शासन दरबारी मांडणारा झुंझार लढवय्या बेधडक शैली व स्वाभिमानी नेता हरवल्याची खंत व्यक्त अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना ह्या त्यांचा बोलण्यातून जाणवत होत्या आज समाजातून जरी मा कांबळे साहेब हे निघून गेले असले तरी त्यांचे विचार व कार्य हे सदा प्रेरणा देणारे आहे म्हणून साहेब हे चिरंतर स्मरणात राहतील व ते आपल्यातून निघून जरी गेले तरी ते अमर असल्याचे अनेकांनी आपल्या भाषणामध्ये आपले विचार मांडले. यावेळी राष्ट्रीय लहूशक्ती विदर्भ अध्यक्ष श्री समाधान साठे, जिल्हा उपाध्यक्ष श्री शालिकराम नेमाडे, जिल्हा सरचिटणीस श्री प्रदिप कांबळे, श्री ज्ञानेश्वर पवार जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी, राष्ट्रीय लहू शक्ती प्रदेश सरचिटणीस युवा ॲड. रजनीकांत कांबळे व गावगावचे सरपंच ग्रामसेवक पो.पाटील सर्व ठिकाणचे शाखा प्रमूख व गावातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Wednesday, August 2, 2023
Home
Buldhana
Buldhana, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मेहकर व लोणार तालुक्यातील विवीध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी
Buldhana, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मेहकर व लोणार तालुक्यातील विवीध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी
Post Top Ad
आम्ही आपला विदर्भ लाईव्ह या वाहीनीची निर्मिती केली जनसामान्यांची शक्ती एक केंद्रित झाली तर कोणतीही ताकद तिला अडवू शकत नाही त्यासाठीच या उपक्रमात आपली साथ आम्हाला मोलाची आहे सहभागी व्हा सहकार्य करा आणि ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीविषयी त्या गावाविषयी कृतज्ञ भाव ठेवून आमच्या वहिनीला तुमच्या सेवेची संधी द्या चला तर मग एक नवे क्षितीज. नव्हे एक नवे स्वप्न आपण मिळून पाहूया आपला विदर्भ लाईव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास आपला विदर्भाचा व देशाचा विकास हे ब्रिद वाक्या मनाशी बाळगून या उपक्रमाची एकजुटीने आपला विदर्भ लाईव्ह या वृत्तवाहिनीला आपले हक्काचे व्यासपीठ बनवूया...