Buldhana, उपसरपंचाला मारहाण गुन्हा दाखल. - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, August 10, 2023

Buldhana, उपसरपंचाला मारहाण गुन्हा दाखल.


                       (छायाचित्र संग्रहित)

उपसरपंचाला मारहाण गुन्हा दाखल. विठ्ठलवाडी येथील घटना

बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले विठ्ठलवाडी येथील उपसरपंच रमेश केशवराव खोडके यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार उपसरपंच यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हकीकत  विठ्ठलवाडी या ठिकाणी कुटुंबासह राहतो व शेतीचा कामधंदा करतो तसेच ग्राम विठ्ठलवाडी गावचा उपसरपंच आहे. मागील सात महिन्यापूर्वी  विठ्ठलवाडी गावची ग्रामपंचाल निवडणुक झाली असून आमच पॅनल निवडुण आले आहे. दि. 05/08/2023 रोजी  ग्रामपंचायतचा रोजदारीचा कर्मचारी गायकवाड माझ्या मोटारसायकल वर बसुन सायंकाळी 6.30 या सुमारास ग्रामपंचायतीच्या नळ योजनेची मोटर बंद करणेसाठी विठ्ठलवाडी बस स्थानक येथून विहिरीवर जात असताना पाण्याच्या टाकी समोर विष्णु शिवराम राठोड यांचे घर असुन त्याचे घरासमोर रोडवर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे मोबाइल फोनवर स्वतःच्या  मोटरसायकलवर बसुन बोलताना मला दिसल्याने व माझे त्यांचे सोबत वैयक्तीक संबंध असल्याने मी माझी मोटारसायकल त्याचे मोटारसायकलच्या समोरील चाकाजवळ उभी केली व माझे गाडीचे पुढील चाक हे ग्रामसेवक यांचे मोटारसायकल च्या समोरील चाकाला लागले त्यावेळी विष्णु शिवराम राठोड हे त्याच्या घरामधुन हातामध्ये काठी घेवुन घराच्या बाहेर आले मी दिसताच माझ्या जवळ आले व मला अचानक शिवीगाळ करू लागला त्याने माझा गालावर दोन तिन चापटा मारल्या व त्याच्या जवळ असले काठी माझा दोन्ही हातांच्या दंडावर व डोक्यावर तसेच कमरेवर मारून मला जखमी केले. मी त्याला समजविन्याचा प्रयत्न केला असता त्याने मला तु पाटील आहेस तुमच्या पाटलाच्या........ अशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली तसेच तुमचे दोन चार घरे आहेत तुम्ही तुमच्या येरियात रहा आमचे देरियात येवु नका असे म्हणुन मला शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. सदर व्यक्ती पासून मला व माझा कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. असे उपसरपंच यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डोणगाव पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल असून पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.. 

Post Top Ad

-->