(छायाचित्र संग्रहित)
शेगाव तहसीलच्या महसूल सहाय्यकास लाच घेताना रंगेहाथ अटक...
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका महसूल सहाय्यकास लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ लाच घेताना अटक आली आहे.
सविस्तर हकिकत शेगाव तालुक्यातील रा.पहुरपूर्णा तक्रारदार यांचे आजोबांची ग्राम येऊलखेड येथील गट क्रमांक ७८ मधील ६६.५० आर शेती ही तुकडेबंदी अंतर्गत तक्रारदार यांचे वडील व काकांच्या नावाने करायची असल्याने त्यांनी एस. डी. एम कार्यालय खामगाव येथे अर्ज केला होता सदर अर्ज पुढील चौकशी कामी तहसील कार्यालय शेगाव येथे आला असता तेथील तयार झालेला अहवाल परत एस. डी.एम कार्यालय खामगाव येथे पाठवण्यासाठी आलोसे संदीप दाभाडे पद (प्रस्तूतकार)महसूल सहायक तहसील कार्यालय शेगाव हे ३००० रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत लिखित तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडे केली असल्याने, लाच लुचपत विभागाने आयोजित पडताळणी करून कार्यवाही दरम्यान आरोपी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 2500 मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी यांनी सदर लाचेची रक्कम रु.2500 पंचासमक्ष तहसील कार्यालय शेगाव येथे स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई मारुती जगताप, पोलीस अधिक्षक,देविदास घेवारे ,
अप्पर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाईची तपास अधिकारी श्रीमती शितल घोगरे,पोलीस उपअधीक्षक , ला.प्र.वि.बुलडाणा व कारवाई पथक
पोलीस उपअधीक्षक श्रीमती शितल घोगरे.
पोलीस निरीक्षक महेश भोसले.
सापळा पथक
स.फौ. शाम भांगे, पोहेकॉ .विलास साखरे,ना.पो.शि. जगदीश पवार,ना.पो.शि. विनोद लोखंडे पो. कॉ.शैलेश सोनवणे, मपोकॉ स्वाती वाणी ड्रा.नापोका नितीन शेटे सर्व ला.प्र.वि बुलडाणा यांनी सापळा रचून यशस्वी कारवाई केली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग,बुलडाणा
@दुरध्वनी क्रं - 07262- 242548,
मो.9657066455
@टोल फ्रि क्रं 1064
------------------