बेलगाव मध्ये भामट्याचा आता नवीन फंडा
सोलर चा वायर काढून त्यामधील तांब्याचा तार करतात चोरी
(APALA VIDARBH LIVE गजानन जाधव बेलगाव)
मेहकर तालुक्यातील बेलगाव मध्ये भामट्यानी शेतातील सोलर पंपाचे एक नव्हे तर तब्बल सहा शेतकऱ्यांच्या शेतातील रात्ऊ दरम्यान येऊन 70 ते 80 फुटाचे केबल तोडून लंपास केले आणि असल्याची घटना घडली मात्र शेतकरी जेव्हा सकाळी शेतात गेले तेव्हा त्याच्या सोलरचे केबल कापलेले दिसले मग त्या शेतकरी यांनी आजूबाजूला असलेल्या शेतकरी याना फोन द्वारे सुचना दिली कि माझ्या सोलरचे केबल तोडु नेले तुम्ही तुमच्या सोलरचे केबल नेले का बघा तेव्हा शेतकरी शेतात आले असताना त्यांना त्यांच्या सोलरचे केबल तोडलेले दिसून आले शेतकरी यांनी डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये संपर्क करुन घटना घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिल्यानंतर घटना स्थळी डोणगाव पोलीस कर्मचारी गोंविद खंडागळे व गवई घटना स्थळी येऊन पाहणी केली असता सहा शेतकरी यांच्या शेतातील सोलरचे केबल तुटलेले दिसले शेतकरी यांनी डोणगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन संपूर्ण हकिकत ठाणेदार अमरनाथ नागरे याना तोंडी सागितले आणि आजुबाजूला शेतकरी यांनी पाहणी केली असता केबल जाळुन तांबे बाहेर काढले असा प्रकार शेतकरी यांना दिसला पुढील तपास डोणगाव ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या..! https://www.apalavidarbhalive.com/2023/08/vashim.htmlयावेळी शेतकरी श्रीराम वानखेडे. विजय वानखेडे. चंद्रकांत वानखेडे. मदन वानखेडे. योगेश वानखेडे. चंद्रकांत वानखेडे हे उपस्थित होते