VASHIM मोकाट जनावरांना आवर घालणार कोण..? - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, August 26, 2023

VASHIM मोकाट जनावरांना आवर घालणार कोण..?


                                     रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या..

रिसोड मधील नागरिक त्रस्त प्रशासन उदासीन..

(APALA VIDARBH LIVE दिपक मापारी कवठा प्रतिनिधी)

वाशिम शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या मोकाट जनावरांना आवर घालणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहरात गेल्या काही दिवसापासून मोकाट जनावरांची संख्या वाढतच आहे. त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहे. हे धावत्या वाहनाला अथळा करतात. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे..

शहरातील लोणी रोडवर मोकाट जनावरांचा ठिया. शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरांचा हैदोस असतो.. रस्त्यावरील धावणाऱ्या वाहनाच्या आडवे जात असतात त्यामुळे अनेकदा किरकोळ अपघात घडत असतात. वाहनधारकामध्ये भीतीचे वातावरण असून, अपघाताचा धोका वाढला आहे. हे मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध उभे राहत असल्याने अनेकदा वाहतूकही विस्कळीत होते. शहरात हे जागोजागी दिसून येत आहेत. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शहरातील नागरिक करीत आहेत..

Post Top Ad

-->