साडी चोळी देऊन केला सन्मान.. संपन्न
(आपला विदर्भ live अंकुश वानखेडे जानेफळ )
मेरी माटी, मेरा देश " अभियानांतर्गत बचत गटात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून स्थानिक जाणेफळ येथील श्री सरस्वती परिवाराने बचत गटात काम करणाऱ्या आणि शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या 10 महिलांचा साडी व चोळी देऊन सन्मान केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे उपप्राचार्य रामदास धामोडकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षक प्रा. डॉ. शिवाजी म्हस्के, मुख्याध्यापिका सौ. मीनल जोहरे, श्रीमती किरण चांदणे, इंग्रजी विषयाचे तज्ञ गजानन जाधव, शिक्षक प्रतिनिधी कृष्णा हावरे उपस्थित होते.
सुरुवातीला 15 ऑगस्ट रोजी उत्कृष्ट भाषण करणाऱ्या व उर्वरित विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचेसादरीकरण करण्यात आले. यात कु. काकडे, कु अटक, कु. मेहेत्रे व कु. उंबरकर यांनी अप्रतिम भाषणे सादर केली. शिक्षकांच्या वतीने त्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे खिचडी शिजवणाऱ्या भगिनींचे मंचावरील मान्यवरांच्या हस्ते साडी व चोळी देऊन स्वागत करण्यात आले. अतिशय अल्पशा मजुरीवर त्यांचे चाललेले हे कार्य खऱ्या अर्थाने समाजसेवाच आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. असे मत प्रा. डॉ. शिवाजी म्हस्के यांनी व्यक्त केले.
त्यानंतर एनसीईआरटी च्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू भेट म्हणून देण्यात आली. यात चार विद्यार्थ्यांनी सुद्धा रांगोळी काढल्या होत्या. त्यानंतर वाढदिवसाच्या निमित्ताने इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक प्रवीण खरात यांचा भेटवस्तू पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींना भेटवस्तू मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुनील घुगे व प्रा. नंदकिशोर बोकाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शनजि. एम. जाधव यांनी केले.