BULDHANA DONGAON, भामट्या दुचाकी चोराला डोणगाव पोलिसांनी अवघ्या चार तासातच केले अटक - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, August 19, 2023

BULDHANA DONGAON, भामट्या दुचाकी चोराला डोणगाव पोलिसांनी अवघ्या चार तासातच केले अटक


भामट्या दुचाकी चोराला डोणगाव पोलिसांनी अवघ्या चार तासातच केले अटक...

डोणगाव;-डोणगाव सध्याच्या युगात कमी वेळात जास्त इन्कम व जास्त पैसा मिळवण्याच्या मोह लागलेल्या काही युवकांना गुन्हेगारीमध्ये उडत आहे. खर्च अफाट पैसा पुरेना मग करायचं काय लोकांच्या लाखो रुपयांच्या गाड्या अगदी  15 ते 20 हजार रुपये विकून  ताबडतोब पैसा कमावण्याचा मोह आता लागला  आहे. मात्र हा मोह अधिक काळ टिकत नसल्यामुळे असाच काही प्रकार डोणगाव मध्ये सुद्धा घडला आहे. डोणगाव येथील जैन गल्ली मध्ये घरासमोर उभी असलेली मोटर सायकल हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर MH,20/ DM,0845 मोटर सायकल किंमत 30,000 रुपये असलेली दुचाकी चोरट्याने पसार केल्याची घटना घडली होती मोटर सायकल मालक यांनी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि घडलेली हकीकत पोलिसांसमोर मांडली मात्र  पोलिसांना हकीकत ऐकताच थंड अवस्थेत न बसता ताबड तोड पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या चार तासातच मोटरसायकल सह आरोपीच्या बुचक्या आवळल्या आरोपी ज्ञानेश्वर गजानन इंगोले राहणार पांगरी कुटे येथील वय वर्ष 30 या युवकाला डोणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर युवकाला कमी वेळात जास्त पैसा कमवण्याचा मोह मात्र चांगलाच महागात पडला असंच म्हणता येईल. सदर घटनेचा पुढील तपास डोणगाव ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शक खाली टाऊन जमदार सतीश मुळे. पीसी ज्ञानेश्वर घायाळ करीत आहेत..

विशेष:डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा तपास सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या चार तासातच तपास लावल्याने डोणगाव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे विशेष

Post Top Ad

-->