Buldhana, ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याचे अमीष दाखवून लोखो रुपायाची फसवणूक - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, October 3, 2023

Buldhana, ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याचे अमीष दाखवून लोखो रुपायाची फसवणूक



ऊस तोडणीसाठी मजूर पुरवण्याचे अमीष दाखवून लोखो रुपायाची फसवणूक करणार्या दोन अरोपीस अटक दोघांनाही आठ दिवसाची पोलीस कोठडी 

(APALA VIDARBH LICVE देवानंद सानप)

बिबी -  अमोल बैजीनाथ शिंदे वय 33 वर्ष धंदा शेती रा रायमोहा ता शिरूर कासार जि बिड यांच्याकडून  पो स्टे बिबी अंतर्गत असलेल्या बीबी येथील गोविंद चव्हाण व खापरखेड येथील राजू राठोड यांनी 16 सप्टेंबर 2022 मध्ये साखर कारखान्याला ऊस तोड करण्यासाठी मजूर पुरवण्यासाठी 12 लाख 60 हाजार रु घेतले मात्र ऊस तोडणी साठी मजूर पाठवलेच नसल्याने सदर फिर्यादी ची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून पोलीसांनी दोन आरोपी विरूध्द आज दि 2 आक्टोंबर रोजी गुन्हा दाखल करून दोघांना अटक करून लोणार न्यायालयात उभे केले असता दोघांनाही आठ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे 

याबाबत असे की, बीड जिल्हा तील अमोल बैजीनाथ शिंन्दे यांच्या कडे  एक ट्रॅलीसह ट्रक्टर असुन ते कंचेश्वरा शुगर ली मंगरुळ ता तुळजापुर जि उसमनाबाद या साखर कारखाण्याला  ट्रक्टर उसतोडीचे मजुरासह उसवाहतुकी साठी कारखाण्याला

लावतात. 2022 वर्षीचे हंगामासाठी त्यांनी कारखाण्या सोबत करार करुन ऊस तोडीचे मजूर आणण्यासाठी कारखाण्या कडुन अॅडव्हांस पैसे घेतले व काही जवळचे पैसे असे घेवून  मजुरांना पाहण्यासाठी माहे सप्टेंबर 2022 मध्ये मी तसेच अनुरथ भगवान सानप ,बाबु बादशहा भाई पठाण  दोन्ही रा तागडगाव जि बीड व  सुनिल मच्छींदर कुसळकर रा वडरवाडा ता शेवगाव जि अ. नगर असे चौघे मिळुन बिबी येथे गोविंद रामधन चव्हाण, वसंत विश्वनाथ चव्हाण यांना बिबी येथे येवून भेटलो त्यांचेशी 14 जोडी

उसतोड मजुर मिळण्याकरीता बोलुन गोविंद रामधन चव्हाण व वसंत विश्वनाथ चव्हाण यांनी आम्हाला ऊसतोडी साठी 14 जोडी मजुर पुरवीतो असे आमच्यात ठरले.व दि 16 सप्टें 2022 रोजी दुपारी 2 वा मलकापुर पांग्रा रोडवर बिबी

मोंढयात अमोल वैजीनाथ शिंदे नी नगदी 3,48,333/रुपये  तसेच बाबु बादशहापठाण यांचे कडुन नगदी 2,15,000/रु, अनुरथ भगवान सानप यांचे कडुन नगदी 3,48,333 रु, सुनिल मच्छींद्र कुसळकर यांचे मार्फतीने मी 348334 असे एकुण 12,60,000रुपये रोख प्रत्येकी जोडी मजुर करीता 900000रुपये प्रमाणे गोविंद  रामधन चव्हाण व वसंत विश्वनाथ चव्हाण यांचे हाताने दिले व गोविंद रामधन चव्हाण, वसंत विश्वनाथ चव्हाण यांनी आम्हाला मला अमोल शिंदेला 04 ऊसतोडी मजुरांचा क7,00,000रुपये घेवून मजूर कामाला न पाठवीता त्यांचा ही राजु प्रल्हाद राठोड रा खापरखेड घुले यांनी विश्वासघात करुन फसवणुक केली आहे. तसेच मुकादम वंदन बळवंत थिट रा आरनी ता लोहारा जि उस्मानाबाद यांना सुध्दा राजु

प्रल्हाद राठोड व त्यांचे साथीदाराने रा खापरखेड घुले ता लोणार जि बुलढाणा यांनी ऊसतोड मजुर पुरवीतो असे म्हणुन दि 4 नोव्हे2022 रोजी त्यांचे सोबत मजुरांकडुन करार करुन घेवुन मजुरांची नावे सांगुन हे मजुर ऊस तोडीचे कामाला पुरवीतो असे त्यांना विश्वास देवुन त्यांचे कडुन मजुरांचे कामाचे आडव्हांस पैसे नगदी एकुण 1,35,000रुपये घेवून मजुर कामाला न पाठवीता त्यांचा ही राजु प्रल्हाद राठोड रा खापरखेड घुले यांनी विश्वासघात करुन फसवणुक केली आहे. नमुद आरोपी यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना ऊसतोड करण्यासाठी मजुर पुरवीण्याचे आमिष दाखवून त्यांचे कडुन 2417000/रुपये (चोवीस लाख सतरा हजर रुपये ) आम्हाला विश्वासात घेण्यासाठी मजुरा सोबत नोटराईज करारनामे करुन करुन मजुर ऊस तोडी साठी पाठवीले नाही असा  रिपोर्ट  दि ला होता यावरुन बीबी पोलीसांनी अप नं 173/2023 कलम 420,406, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपी  गोविंद रामधन चव्हाण वय 46 वर्ष रा बिबी ,राजु प्रल्हाद राठोड वय 37 वर्ष रा खापरखेड घुले यांना दिनांक 1आक्टोंबर रोजी अटक करण्यात आली असुन आज दि 2 आक्टोंबर रोजी लोणार  न्यायालयात  हजर केले असता  त्यांना दि 9 आक्टोंबर आठ दिवसाची  पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास ठाणेदार सदानंद सोनकांबळे  नापोकों अरुण सानप ,पोकॉ यशवंत जैवळ हे करीत आहे.

Post Top Ad

-->