BULDHANA किमान वेतनसाठी घंटागाडी कामगार यांचं काम बंद आंदोलन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, October 3, 2023

BULDHANA किमान वेतनसाठी घंटागाडी कामगार यांचं काम बंद आंदोलन

किमान वेतनसाठी घंटागाडी कामगार यांचं काम बंद आंदोलन

खामगाव नगर परिषदेसमोर लावल्या घंटागाड्या 

किमान वेतन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी खामगाव शहरातील घंटागाडीद्वारे कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी आज मंगळवारी काम बंद आंदोलन पुकारले.  वारंवार कामबंद आंदोलन करूनही या कामगारांच्या समस्यांकडे नगर पालिका प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे, त्यामुळे या कामगारांनी पुन्हा कामबंद आंदोलन छेडले आहे. खामगाव शहरातील कचरा संकलीत केल्यानंतरही कंत्राटदाराकडून किमान वेतन दरानुसार पगार दिल्या जात नाही. वेळेवर पगार दिला जात नाही. पगार स्लीप दिली जात नाही. असा आरोप करत मंगळवारी जवळपास सर्व घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या गाडया नगर परिषद कार्यलयासमोर उभ्या करुन कामबंद आंदोलन केले. एकजुट झालेल्या कर्मचाऱ्यांनी यावेळी आपल्या मागण्यांबाबत घोषणाबाजी केली. कचरा संकलन करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजनेची न.प. मध्ये अंमलबजावणी करावी, सफाई  कर्मचारी व वाहन चालक यांचे किमान वेतनाप्रमाणे पगार द्यावे, सर्व कामगारांना व्यक्तीगत संरक्षणकिट देण्यात यावेट, नादुरुस्त गाड्या दुरुस्त करून देण्यात यावे,अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. जोपर्यंत कंत्राटदार व नगरपालिका किमान वेतन देण्यासंदर्भात अग्रीमेंट करुन देत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत घंटागाडी कर्मचाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.. त्यानुसार त्यांच्या विविध प्रश्नाबाबत तोडगा काढण्यातील असे खामगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले.

Post Top Ad

-->