डीपी व सडलेले पोल बदलण्याची होती मागणी
लेखी आश्वासनानंतर उतरले खाली मेहकर- तालुक्यातील बाभुळखेड गावातील डीपी व सडलेले पोल बदलण्याच्या मागणीसाठी विद्युत वितरण कार्यालयाच्या वारंवार चकरा मारूनही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त होत बाभुळखेड येथील सरपंच शिवशंकर गायकवाड यांनी चक्क विद्युत वितरण कंपनी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या टावरवर चढून "शोले" स्टाईल आंदोलन केल्याने विद्युत वितरण कार्यालयात एकच खळबळ उडाली होती अखेर उपविभागीय अभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.
या बाबत अधिक माहितीनुसार बाभुळखेड येथील विद्युत डीपी गेल्या ९ महिण्यापासून नादुरुस्त असून त्यामुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच गावातील काही विद्युत पोलची अत्यंत दुरावस्था झाली असून ते पोल पूर्णपणे सडले आहेत व पोलचे तार हे खाली लोंबकाळत आहेत यामुळे अपघात होऊन जिवित हानि होऊ शकते म्हणून हे पोल बदलून नविन पोल बसवावे व नविन डीपी बसवीण्याची मागणी उपविभागीय अभियंता यांच्याकडे १४ मार्च २०२३ रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्यानंतर सरपंच गायकवाड़ व गावकरी यांनी विद्युत वितरण कार्यालयात अनेक चकरा मारल्या परंतु या कडे कार्यालयतील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष दिले नाही त्यामुळे संतप्त होत आज ७ नोव्हेम्बर रोजी बाभुळखेड येथील सरपंच शिवशंकर गायकवाड हे गावकऱ्यासह विद्युत वितरण कार्यालयात पोहोचले व कार्यालया मागे असलेल्या टॉवरवर चढले याची माहिती मिळताच विद्युत वितरण कार्यालयात एकच गोंधळ उडाला यावेळी उपविभागीय अभियंता कळसकर यांनी गायकवाड़ यांची समजूत काढत त्यांना येत्या ८ दिवसात डीपी व विद्युत पोल बदलण्याचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर गायकवाड़ यांनी आंदोलन मागे घेत ते टॉवरच्या खाली उतरले या वेळी बाभुळखेड येथील गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थि