Buldhana लोकशिक्षण कला संचाची एचआयव्ही/एड्स/गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण बाबत कलापथकाद्वारे जनजागृति - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, February 10, 2024

Buldhana लोकशिक्षण कला संचाची एचआयव्ही/एड्स/गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण बाबत कलापथकाद्वारे जनजागृति


हाराष्ट्र शासनाच्या एड्स नियंत्रण सोसायटी,मुंबई व एड्स नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा यांचे मार्गदर्शनाखाली  भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे नोंदनीकृत लोकशिक्षण बहूउद्देशीय सांस्कृतिक क्रीड़ा मंडल ,दे माली च्या युवा लोकलावन्त शाहिर गजेंद्र गवई व कला संच यांचा बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड़ राजा, लोणार, मेहकर तालुक्यातील नियोजित अनेक गावात एचआयव्ही/एड्स/गुप्तरोग प्रतिबंध ,उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम 2023-24 अंतर्गत बहारदार लोककलेच्या कलापथक कार्यक्रमा द्वारे जनजागृति करण्यात आली.

एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई म रा च्या सहाय्यक संचालक श्रीमती सुदेशना चक्रवर्ती मैडम व डापकु जिल्हा बुलडाणा चे कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 8/02/2024 ते 10/02/2024 या कालावधीत सुल्तानपुर, बीबी ता लोणार,सिंदखेड़ राजा, मिलिंद नगर मेहकर,डोणगाव, कलम्बेश्वर, जानेफल ई ठिकाणी लोकशिक्षण कला संचाचे गजेंद्र गवई आणि पार्टी यांनी, एचआयव्ही/एड्स/गुप्तरोग संक्रमण, होण्याची  कारने, प्रतिबंध, उपचार, सल्ला मार्गदर्शन केंद्र , टोल फ्री 1097 नम्बर ,NACO एप्स ,दक्षता, ई बाबत विविध लोककला , लोकगीते, संवाद , द्वारे कलासंचाचे लोकलावन्त शाहिर गजेंद्र गवई, शाहिर मल्हारी गवई,(हारमोनियम वादक) गायक विलास गवारगुरु, राजू हिवराले(ढोलकि) गायिका कल्पना सिरसाठ, गायिका ज्योति मिसाल, सहकलाकार प्रदीप जाधव , संदीप गवई,  वसंतराव अवसरमोल,संतोष दाभाड़े,विजयानंद अंभोरे , मिलिंद कंकाल ई कलावनतानी आपला विशेष सहभाग नोंदवून प्रभावी सादरिकरण   केले.

सदर जनजागृति कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी समुपदेशक नीलेश जाधव, सारिका खंडारे, नगरसेवक सुनीता ढाकरके, पुरुषोत्तम गावंडे लैब टेक्नीशियन,संदीप उगले,दीपक शेगोकर,रविन्द्र मवाल, मातृभूमि फाऊंडेशन बुलडाणा चे सागर लोंढे, विशाल आढाव,शेख मेहबूब,शिल्पा जाधव, रेणुका गायकवाड़, गंगा घुबे,राजू आमले यांचे सह  जानेफल  प्रा आ केंद्र चे वैद्यकीय अधिकारी डॉ ठाकरे , आरोग्य सेवक चांगाड़े,अतीक शेख  यांनी विशेष योगदान व सहकार्य केले.

सदर कार्यक्रमाच्या सादरिकरन दरम्यान सम्बंधित गावाचे सरपंच, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, यांचे सह बहुसंख्येने महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Post Top Ad

-->