JAL JIVAN जल जीवन मिशनचे वाजले तीन तेरा आमदार संजय रायमुलकर Sanjay Raimulkar आक्रमक - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, August 17, 2024

JAL JIVAN जल जीवन मिशनचे वाजले तीन तेरा आमदार संजय रायमुलकर Sanjay Raimulkar आक्रमक


         पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी मंगळवारी बैठक 

अनेकांनी केल्या तक्रारी उपोषण मात्र कारवाईच्या नावाने बोंबाबोंब

बुलढाणा,केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी असलेली 'हर घर नल से जल' ही योजना महाराष्ट्रात जलजीवन मिशन म्हणून ओळखली जाते. मात्र, मोठा गाजावाजा असलेल्या या योजनेचा बोजवारा मेहकर तालुक्यात उडाला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा  पाणीटंचाई समस्या निर्माण आला आहेत. २०२२ मध्ये सुरू झालेल्या जलजीवन मिशनच्या कामानंतर तालुका टँकरमुक्त होईल, अशी आशा फोल ठरत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून अपूर्ण पडलेल्या योजनाचे तीन 13 वाजल्याचे चित्र तालुक्यात आहे. Video link JAL JIVAN जल जीवन मिशनचे वाजले तीन तेरा आमदार Sanjay Raimulkar आक्रमक.. हे ही पाहा..

या संदर्भात आमदार संजय रायमुलकर आक्रमक झाले असून सदर कामासंदर्भात पालकमंत्री यांची मंगळवारी मुंबई येथे बैठक होत असून मेहकर मतदारसंघातील जलजीवन मिशनचा विषय या बैठकीत उपस्थित केल्या जाणार आहेत मेहकर मतदारसंघात जलजीवनची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जातील तर काही ठिकाणी अपूर्ण कामे होत आहेत सदर कामाच्या अनेक तक्रारी उपोषण संबंधित अधिकाऱ्याकडे करण्यात आले आहे मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी यावर कोणतीच ठोस कारवाई केली नसून फक्त कागदी घोडे नाचविल्याचे दिसत आहे त्यामुळे शासनाने गावकऱ्यांसाठी पाण्याची सुविधा व्हावी यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे मात्र हा निधी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा कंत्राटदारा सोबत असलेले हितसंबंध यामुळे कुठेच कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे आता आमदार संजय रामुलकर आक्रमक झाले असून त्या संदर्भात मुंबई येथे बैठक लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे

बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे तीन तेरा वाजल्याचे चित्र एकंदरीत आहे यामध्ये नेहमी चर्चेत असणारा मतदारसंघ मेहकर तालुक्यात चालू असलेले जल जीवन मिशन योजनेचे काम आज पर्यंत एकही पूर्ण न झाल्याची धक्कादायक माहिती आहे.  

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मेहकर अंतर्गत एकूण 92 जल जीवन मिशनच्या योजना ग्रामीण भागातील खेड्या गावांमध्ये टाकण्यात आले आहेत. मात्र यापैकी एकही योजना आजपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

Post Top Ad

-->