(आपला विदर्भ लाईव्ह नासीर शेख)
पातूर :पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत आलेगाव येथे संदीप विलासराव देवकते यांचे दुकान व गोडाऊन मध्ये गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यासाठी साठवून केल्याची गुप्त माहिती बाळापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांना मिळताच , जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनात चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांनी आपल्या सहकार्यासह शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजीच्या दुपारी धाड टाकून तंबाखूजन्य पदार्थ ५०३७८६,/ चार चाकी वाहन ५०००००,/ एक मोबाईल १००००,/ असा एकूण १० लाख १३ हजार ७८६, रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
या अधिकाऱ्यांनी केली कारवाई
चान्नी ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे, उपनिरीक्षक गजानन केदार, सुनील भाकरे, ज्ञानेश्वर गीते, उज्वला ईटीवाले, राहुल वाघ ( चालक) व पोलीस उपविभागीय पथकातील संजय मात्र, संतोष सोळंके, संतोष करंगळे, विठ्ठल उकर्डे, गजानन शिंदे, योगेश चौधरी, स्वप्निल वानखडे, तसेच पातुर ठाण्याचे इस्माईल, शंकर बोरकर, अंकुश राठोड यांनी कारवाई केली आहे.