CHIEF EDITOR NEWS कौतुकाची थाप लेखणीला बळ देणार - संपादक देवीदास खनपटे - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, August 17, 2024

CHIEF EDITOR NEWS कौतुकाची थाप लेखणीला बळ देणार - संपादक देवीदास खनपटे

(APALA VIDARBH NEWS NETWORK)
पुरस्कार प्राप्त संपादकांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

संपादक सादिक कुरेशी, कैलास राऊत, अन्सार भाई यांचा संपादक संघटनेने केला सन्मान.!

बुलढाणा, पञकारीता क्षेत्रात मागिल अनेक वर्षांपासून नावीन्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संपादकांच्या पाठीवर कौतुकाची थाप आज शनिवारी दै.  वृत्तपञ संपादक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने टाकण्या आली. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त दैनिक बातमीजगतचे मुख्य संपादक कैलास राऊत यांना बुलढाणा येथील मानस फाउंडेशनच्या वतीने यावर्षीचा बहुमानाचा ' वृत्तगौरव' पुरस्कार देऊन बुलढाणा अर्बनचे सर्वसर्वे राधेश्याम चांडक (भाईजी )यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मेहकर महसूल च्या वतीने भव्य ध्वजारोहण सोहळ्यात दैनिक दिव्य मातृछायाचे संपादक सादिक कुरेशी,व विदर्भजगतचे मुख्य संपादक अन्सार भाई शेख यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.   VIDOE LINK तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही- संजय गायकवाड

हे तीनही संपादक दैनिक वृत्तपत्र संपादक संघटनेचे पदाधिकारी असून यांचा आज 17 ऑगस्ट 2024 रोजी मेहकर येथील विश्रामगृहावर संघटनेच्या वतीने भव्य सत्कार घेऊन त्यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक तथा संघटनेचे मार्गदर्शक दैनिक विदर्भ सत्यजित चे मुख्य संपादक उद्धव फंगाळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आपलाविदर्भ चे मुख्य संपादक देविदास खनपटे ,विदर्भ न्यायवर्तीचे संपादक निलेश काळे, दैनिक सेवाशक्तीचे संपादक अंकुश राठोड, यासह विविध मान्यवर उपस्थित होते.. यावेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली तर ते आणखी जोमाने काम करतील आणि त्यांच्या लेखणीला  'बळ'  मिळेल असे विचार देविदास खनपटे यांनी व्यक्त केले ‌ . मिळालेल्या पुरस्कारमुळे अजून जबाबदारी वाढली आहे . अशा भावना सत्कार्याला उत्तर देताना कैलास राऊत यांनी व्यक्त केली व संघटनेचे आभार मानले. त्यानंतर संघटनेच्या पुढील धैर्य धोरणाबद्दल महत्त्वाची बैठक संपन्न झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संपादक निलेश काळे यांनी केले.

Post Top Ad

-->