मेहकर शहरांमध्ये वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून सणासुदीचे दिवस आहेत कावड यात्रा सुरु आहेत हायस्कूल शाळा अशा परिस्थितीत मेहकर शहरात गर्दी वाढत आहे मात्र दररोज वाहतुकीचा खोळंबा होत असून वाहतूक पोलीस नेमकी कोणती ड्युटी करतात हे समजत नाही सणासुदीचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील महिला पुरुष मोठ्या संख्येने मेहकर शहरात येत असतात तर शहरात विविध शाळा हायस्कूल व महाविद्यालय आहेत विद्यार्थ्यांची गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते दुचाकी चार चाकी वाहनांची गर्दी सुद्धा असते मात्र वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे वाहतुकीचा दररोज खोळंबा होताना दिसत आहे.
पायी चालणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास होत आहे दररोज लहान लहान किरकोळ अपघात होतच आहेत विद्यार्थी व वयोवृद्ध लोकांनी रस्त्याने कसे चालावे हेच कळेनासे झाले आहे मेहकर शहरात माहिती घेतली असता पोलीस विभागाकडून चार वाहतूक पोलिसांच्या नियुक्त करण्यात आले आहेत मात्र हे वाहतूक पोलीस नेमके कोणत्या ठिकाणी थांबतात हेच मेहकर वाशियांना कळेनासे झाले आहे वाहतूक दररोज जाम होत आहे मात्र वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेवर कोणीच उपस्थित राहत नाही त्यामुळे मेहकरचे ठाणेदार यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन ज्या वाहतूक पोलिसाची ड्युटी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच त्याला थांबायला लावणे गरजेचे आहे मात्र तसे होताना बिलकुलही दिसून येत नाही सतत वाहतूक जाम होत असल्याने वाहनधारक व पायी चालणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास होत असून पोलिसांच्या विरोधात रोष निर्माण होताना दिसत आहे