PANDHARPUR | पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार समोर - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, August 19, 2024

PANDHARPUR | पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा काळाबाजार समोर

पंढरपुर,लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनाचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  भाविकांकडून पैसे घेऊन विठ्ठलाचे व्हीआयपी पदस्पर्श दर्शन घडवून देणार्या एका फुल विक्रेत्या विरूद्ध पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुमीत शिंदे असे या पेड दर्शन देणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी चेतन शशिकांत काबाडे ( रा. वाशिंद खातवली ता.शहापूर जि. ठाणे) या भाविकाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील चेतन काबाडे हे आपल्या कुटुंबा समवेत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज दुपारी पंढरपुरात आले होते. दर्शनासाठी मोठी गर्दी असल्याने सात ते आठ तास इतका वेळ लागत होता त्यामुळे दाभाडे यांनी लवकर दर्शन मिळण्याची कुठे सुविधा आहे का अशी चौकशी केली असता, त्यांना संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपा जवळ एक फुल विक्रेता आहे त्याच्याकडून दर्शन मिळेल अशी त्यांना माहिती मिळाली. त्यानंतर कबाडे हे दर्शन मंडप जवळ आले व फुल विक्रेत्याकडे दर्शनाची चौकशी केली असता लवकर दर्शन मिळेल पण त्यासाठी त्याने चार हजार रूपये लागतील असे सांगितले.   Video link JAL JIVAN जल जीवन मिशनचे वाजले तीन तेरा आमदार Sanjay Raimulkar आक्रमक.. हे ही पाहा..

त्याची पावती तुम्हाला मिळेल, आम्हालाही वरपर्यंत पैसे द्यावे लागतात असे सांगून कबाडे यांच्याकडून संशयित आरोपी सुमित शिंदे याने आपल्या मोबाईल मधील स्कॅनरवर कबाडे यांच्याकडून चार हजार रुपये घेतले. त्यानंतर शिंदे यांनी कबाडे व त्यांच्यासोबत आलेल्या चौघांना मंदिरातील गेटमधून दर्शनासाठी सोडले. यावेळी कबाडे यांनी आरोपी शिंदे यांच्याकडे पावतीची मागणी केली असता तुम्ही दर्शन घेऊन या मी तुम्हाला बाहेर पावती देतो, असे सांगून तो बाहेर गेला. दर्शन घेतल्यानंतर कबाडे यांनी संशयित आरोपी सुमित शिंदे यांचा पावतीसाठी शोध घेतला असता तो दिसून आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काबाडे यांनी पैसे घेऊन विठ्ठलाचे दर्शन दिल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या या तक्रारीनंतर संशयित आरोपी सुमित शिंदे यांच्या विरोधात पैसे घेऊन विठ्ठलाचे दर्शन घडविले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेड दर्शन प्रकरणी खासगी एजन्टविरुद्ध गुन्हा दाखलकेला, तर मंदिरातील दोन सुरक्षा रक्षक निलंबित करण्यात आले आहेत.

Post Top Ad

-->