Vidhan Sabha Mehkar महाविकास आघाडी कडून जोरदार तयारी! - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, August 17, 2024

Vidhan Sabha Mehkar महाविकास आघाडी कडून जोरदार तयारी!


लोकसभेतील मतदान टक्केवारी कायम ठेवणार का! महायुतीला करावी लागणार कसरत! महाविकास आघाडी व वंचित उतरणार रिंगणात तिसऱ्या आघाडीचाही गनिमी कावा 

(Aapala Vidarbh news network )

मेहकर विधानसभेच्या निवडणुका सुरू होत आहेत त्या दृष्टीने मेहकर मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली सुरू झाले आहेत तर महाविकास आघाडी वंचित या पक्षाचे उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला जोरदार टक्कर देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने आखणी करत आहेत

 या निवडणुकीत मेहकर मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला चांगलीच कसरत करावी लागणार असून महाविकास आघाडी व वंचितचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत तर तिसरी आघाडी सुद्धा गनिमी कावा पद्धतीने निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याची विश्वासनीय सूत्रांकडून माहिती आहे एकंदरीत लोकसभेत महाविकास आघाडीला मिळालेली चांगली मतांची टक्केवारी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडी कडून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम सुरू असल्याचे दिसत आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मेहकर मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला फक्त 273 मतांचा लीड होता त्यामुळे महाविकास आघाडीकडे सहानुभूतीची लाट असल्याचे चित्र मेहकर मतदार संघात जरी असले तरीसुद्धा महायुतीचा उमेदवार पाहता महाविकास आघाडी व वंचित कडून महायुतीच्या उमेदवाराला जोरदार टक्कर देण्याची तयारी सुद्धा सुरू असल्याचे एकंदरीत हालचालीवरून दिसून येत आह महाविकास आघाडीमध्ये मेहकरची जागा काँग्रेस पक्षाला सुटणार की उद्धव बाळासाहेब गटाला सुटणार याबाबत अजून अधिकृत घोषणा झाली नसली तरी सुद्धा या दोन्ही पक्षाकडून इच्छुक उमेदवार आपापली तयारी करत आहेत मेहकर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटावा अशी एक मुखी मागणी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांकडून नुकत्याच बुलढाणा येथे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब गटाला मेहकर मतदार संघात सहानुभूतीची लाट असल्याचे चित्र दाखवून यावेळेस मेहकर मतदार संघाची जागा उद्धव बाळासाहेब गटाला सुटावी यासाठी सुद्धा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे चित्र तरी आहे एकंदरीत मेहकरची जागा महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही पक्षाला सुटली तरी सुद्धा महाविकास आघाडीचे सर्वच इच्छुक उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्ते एक दिलाने व जिद्दीने काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहेत तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी कडूनही जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे लोकसभेमध्ये बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात अतिशय चांगले मतदान घेणारे रविकांत तुपकर यांची तिसरी आघाडी सुद्धा मेहकर मतदार संघात निवडणूक लढवणार असल्याचे बोलल्या जात असून तिसऱ्या आघाडीकडूनही गनिमी कावा पद्धतीने निवडणूक लढविण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

 महाविकास आघाडी कडून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त दिसून येत आहे त्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते जीव लावून आपल्या उमेदवारासाठी काम करतील व आपलाच उमेदवार निवडून आणतील असे चित्र आहे महाविकास आघाडीकडून जर काँग्रेस पक्षाला ही जागा सुटली तर काँग्रेसकडून एडवोकेट अनंतराव वानखेडे, लक्ष्मण दादा घुमरे तर सध्या काँग्रेसमध्ये असलेले मात्र तिकीट मिळण्यासाठी उद्धव बाळासाहेब गटाकडून प्रयत्न करत असलेले सतीश ताजने यांच्या नावाची तिकिटासाठी जोरदार चर्चा आहे दुसरीकडे जर ही जागा उद्धव बाळासाहेब गटाला सुटली तर सिद्धार्थ खरात यांच्या नावाची सुद्धा जोरदार चर्चा असून सिद्धार्थ खरात यांचे नाव उद्धव बाळासाहेब गटाकडे जवळपास निश्चित झाल्याचे बोलल्या जात आहे जागा काँग्रेसला किंवा उद्धव बाळासाहेब गटाला जरी सुटली तरी सुद्धा दोन्ही पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मात्र जास्त असून महाविकास आघाडी यावेळेस जोरदार मुसंडी मारण्यासाठी चांगली तयारी करत असल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे डॉक्टर ऋतुजा ऋंषाक चव्हाण (गवई ) ह्या सुद्धा निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत असून त्या नेमक्या कोणत्या पक्षाकडून उमेदवार राहणार हे अद्याप उघड झाले नसले तरी सुद्धा तिसरी आघाडी व वंचित बहुजन आघाडी हे दोन पर्याय त्यांच्यासमोर सध्या तरी आहेत एकंदरीत मेहकर मतदार संघाचे चित्र पाहता महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली असून त्या पद्धतीची आखणी सुरू असल्याचे दिसून येत आहे रविकांत तुपकर यांची तिसरी आघाडी सुद्धा मेहकर मतदार संघात निवडणूक लढविण्यासाठी तयारी करीत असल्याचे चित्र आहे एकंदरीत सध्याच्या परिस्थितीत हालचाली पाहता महायुतीच्या उमेदवाराला जोरदार टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी व  वंचित बहुजन आघाडी व तिसरी आघाडी सज्ज झाल्याचे चित्र आहे तूर्त एवढेच

Post Top Ad

-->