Sanjay Gaikwad News तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही- संजय गायकवाड - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, August 17, 2024

Sanjay Gaikwad News तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही- संजय गायकवाड

(APALA VIDARVH NEWS NETWORK)
बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा बुलढाण्यात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला होता. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल होत आहे. यावर आमदार संजय गायकवाड म्हणाले की, तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही. मागच्या काळात पोलीस प्रशासनाने असे गुन्हे काही लोकांवर दाखल केले ते माझ्या मते चुकीचे आहे. कारण तलवारीचा वापर कोणाला मारण्यासाठी केला धमकावण्यासाठी केला किंवा दंगलीमध्ये केला असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल होऊ शकतो.  VIDOE LINK तलवारीने केक कापणे हा काही गुन्हा होऊ शकत नाही- संजय गायकवाड

काही व्यासपीठांवर राजकीय पुढार्‍यांना तलवारी गिफ्ट दिल्या जाते त्या आपण पब्लिकला दाखवतो किंवा मुख्यमंत्री तलवार जनतेला दाखवतात त्या कोणाला मारण्यासाठी दाखवतात का ? तलवार बहादुरीचे प्रतीक आहे म्हणून ते दाखवले जाते. तलवार दाखवण्याने जर गुन्हा होतो तर पोलीस परेडमध्ये एखादा डीवायएसपी हजारोच्या गर्दीला ती तलवार दाखवतो तो त्याचा सॅल्यूट करतो तो का मारायला दाखवतो का ? आणि असं असेल तर मग ऑलम्पिकचे गेम पिस्तूल बंद करावे लागेल, तलवारबाजी बंद करावी लागेल हे सर्व बंद करावे लागणार आहे. ज्या समोरच्या व्यक्तीचा उद्देश काय आहे मारण्याचा कापण्याचा असेल तर शंभर टक्के गुन्हा दाखल झाला पाहिजे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर आम्ही हायकोर्टात गुन्हा क्रॅश सुद्धा करू शकतो अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.


Post Top Ad

-->