BULDHANA DONGAON, डोणगावात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा : अवैध वाहतूक जोमात. Police प्रशासन मुंग गीळुन गप्प - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, September 10, 2024

BULDHANA DONGAON, डोणगावात वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा : अवैध वाहतूक जोमात. Police प्रशासन मुंग गीळुन गप्प

डोणगाव येथे वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध प्रवाशी वाहतुक करणार्‍या वाहनांनी मोठा कळस गाठला आहे. त्याचा ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

याबाबत आपला विदर्भ कडे नागरिकांनी तोंडी आपलं मत व्यक्त केलं असून आता मात्र तक्रारी वाढत असताना नव्याने आलेले जिल्हा पोलिस अधिकार्‍यारी या गंभीर बाबीची दखल घेतील.? मात्र स्थानिक पोलिसांचा अवैध प्रवाशी वाहतुकीवर कुठलाच अंकुश राहिलेला नाही. छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावरील असलेले डोणगाव,अंजनी खंडाळा, तसेच डोणगावातून इतर जिल्ह्यात जाणारी वाहने पिंपरी सरत. कुकसा व इतर ठिकाणी - मार्गावर दिवसाढवळ्या वाहतूक होत असताना, पोलिसी कारवाईचा दंडुका मात्र म्यान झालेला दिसत आहे. डोणगाव हे मोठ्या गर्दीचे ठिकाण आहे. डोणगाव या गावाला जवळपास 32 खेडेगाव जोडलेले आहेत त्यामुळे येथे येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या वाहनामुळे अनेक वेळा अपघात होऊन, यात अनेकांचा बळी गेला आहे. 

महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डोणगाव रस्त्यावर दिसणारे वाहतूक पोलिस इतर दिवशी वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला असताना, तेथून गायबच असतात. वर्तमानपत्रात बातम्या आल्या की, थातूरमातूर कारवाई करून, पुन्हा अवैध वाहतुकीला पाठीशी घातले जाते, अशी अवस्था आहे. बेशिस्त वाहतुकीने कळस गाठल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने, ऑटोचालकांच्या मनमानीमुळे सामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. अवैध वाहतूक करणारी वाहने, ऑटो, दुचाक्या, मालवाहू वाहने वाटेल तिथे मनमानी पद्धतीने उभी केली जातात. प्रवासी मिळविण्यासाठी ही वाहने एकदम येऊन मधेच उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहतुकीवर याचा परिणाम होत आहे. विविध ठिकाणी वर्दळीच्या मार्गावर अशी बेशिस्त वाहतूक असून, रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त वाहने उभी केली जातात.

डोणगाव रस्त्यावर सर्वाधिक शाळा, महाविद्यालय  आहे. या रस्त्यावरून  जाणारे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगात जातात. त्यांच्यावर कुणाचाच अंकुश नसल्याने जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. या सर्व गोष्टीकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अवैध वाहतुकीकडे पोलिसांची डोळेझाक या रस्त्यांवर वाहतूक पोलिस उभे असताना, त्यांच्या डोळ्यादेखत कुठेही वाहने उभी केली जातात. अवैध वाहतूक करणारी वाहने प्रवाशांनी गच्च भरून पोलिसांच्या डोळ्यादेखत भरधाव धावतात. परंतु, पोलिस याकडे डोळेझाक करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

Post Top Ad

-->