.jpg)
जागतिक दर्जाचा पर्यटनाचा उज्वल वारसा मिळालेला असताना या पर्यटनस्थळाचा विकास होण्याबरेाबर कृषीशी निगडीत व्यवसायाचा सुद्धा विकास होणे अपेक्षीत होते.परंतु, राजकीय उदासीनता या विकासाला मारक ठरत आली आहे.मात्र येणार्या काळात या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळाला व या मतदार संघाला सोन्याचे दिन आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असलेल्या डॉ.ऋतुजाताई चव्हाण यांनी या पर्यटन क्षेत्रासाठी आणि येथील सुपीक जमिनीसाठी, कृषी आधारीत शाश्वत विकासाची आराखडा तयार केला आहे.या आराखड्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, युवा तरुणवर्गांना रोजगार उपलब्ध करून देण्याची उत्तम योजना त्यांनी आखली आहे. रोजगार, उच्च शिक्षण, आरोग्य, स्किल या सर्व घटकांना समाविष्ट करून अतिशय साचेबद्ध विकास आराखडा तयार केला आहे. डॉ.ऋतुजाताई चव्हाण ह्या पेशाने डॉक्टर असल्यामुळे आधी रोगाचे निदान करून त्यावर ज्या प्रमाणे औषधोउपचार केल्या जातो. त्यानुसार त्यांनी मेहकर लोणार या विधानसभा मतदार संघातील समस्यारुपी आजार शोधून त्यावर सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने औषधोपचार करण्याचा आराखडा तयार केला आहे. माता, भगिनींच्या सक्षमीकरणासाठी लघू उद्योग, गृहउद्योग यांना चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, माता भगिनी, युवाशक्ती यांचा विकास हाच विकसित भारताचा पाया आहे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन डॉ.ऋतुजा चव्हाण ह्या गेल्या कित्येक दिवसांपासून मतदार संघातील समस्यांची माहिती घेऊन त्यावर सक्षम उपाय राबवित आहेत. त्यांचे हे विकासाचे व्हीजन नक्कीच मेहकर लोणार मतदार संघाचे चित्र पालटून टाकणारे आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदार वर्गही त्यांच्या या कामाचे कौतुक करीत आहे. तर, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योगिक अशा अनेक स्तरावर कार्य करून डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी सर्वसामान्य मतदारांच्या मनात घर निर्माण केले आहे. तर चला दृढ संकल्प घेऊया... ऋतुजाताईंना विधानसभेत पाठवूया....असा संकल्पच या मतदार संघातील मतदारांनी केल्याचे दिसून येत आहे.सामाजिक कार्यातील डॉ.ऋतुजा चव्हाण यांचे योगदान पाहता त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.