सरपंच सुधाकर गारोळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
मेहकर. वाढदिवसाच्या निमित्त पार्टी सेलिब्रेशन केल्यास एका दिवसाचा आनंद मिळतो, मात्र याच वाढदिवसाला गोरगरिबांचे विविध मार्गाने सेवा करण्याची मिळालेली संधी आणि यातून मिळणारा आनंद हा जगण्याला नवी ऊर्जा देऊन जातो. असे प्रतिपादन मेहकर मतदार संघाचे इच्छुक उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी केले. ते मेहकर तालुक्यातील वरोडी येथील सरपंच सुधाकर गारोळे यांच्या अभिष्टचिंत सोहळ्यानिमित्त आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, सिंदखेड राजा मतदारसंघातील शिवसेना नेते दिलीप वाघ, किसान सेना नेते बळी, शिवसेना तालुकाप्रमुख लिंगा पांडव, शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे युवा सेनेचे अड्. आकाश घोडे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते व पत्रकार बांधवांची, गावातील पुरुष महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित,
मान्यवरांनी सरपंच सुधाकर गारोळे यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.तर यावेळी मनोगत व्यक्त करताना मेहकर मतदार संघाची इच्छुक उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी वरोडी गावचे सरपंच सुधाकर गारोळे यांच्या वाढदिवसानिमित्त जन्मदिनानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थिती लावून शुभेच्छा देण्याचा योग आला. खरंतर हे गाव तेजस्वी बाबांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे गाव आहे. जिल्हाभरामध्ये बाबांचा खूप मोठा भक्त परिवार आहे. वारकरी सांप्रदायाची परंपरा बाबांनी या भागात जनसामान्यांमध्ये रुजवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे आणि अध्यात्माच्या माध्यमातून जनतेचे दुःख हरण करण्याचे काम केले आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन सुधाकर गारोळे राजकारण आणि समाजकारणात अतिशय रचनात्मक कार्य करत आहेत. सरपंच सुधाकर गारोळे यांच्या हातून अशीच समाजसेवा घडो यामध्ये अधिकाधिक भर पडो, त्यांना आरोग्यदायी दीर्घ आयुष्य लाभो, अशी प्रार्थना ईश्वर चरणी करून सरपंच सुधाकर गारोळे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.तसेच यावेळी इतर मान्यवरांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून सरपंच यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
वरोडी येथील सरपंच सुधाकर गारोळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्वसामान्यासह सिद्धार्थ खरात यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून त्यांना शुभेच्छा दिल्या. तर त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले यावेळी नेत्र चिकित्सा शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.