महावितरणच्या मेहकर विभागीय कार्यालय स्थापनेला मंजुरी प्रदान - आमदार संजय रामुलकर यांच्या प्रयत्नांना यश - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, October 18, 2024

महावितरणच्या मेहकर विभागीय कार्यालय स्थापनेला मंजुरी प्रदान - आमदार संजय रामुलकर यांच्या प्रयत्नांना यश

मेहकर, लोणार, सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यांचा वीजवितरण चा कारभार मेहकर विभागीय कार्यालयातून चालणार 

महावितरणच्या खामगाव विभागीय कार्यालयाचे विभाजन करण्याची मागणी आमदार संजय रायमुलकर यांनी लावून धरली होती. आता महावितरणच्या मुख्यालयातून मेहकर विभागीय कार्यालय स्थापनेस मंजुरी प्रदान करण्यात आली असून, मेहकर विभागीय कार्यालया अंतर्गत मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या चार तालुक्यांचा कारभार चालणार आहे. नवीन विभागीय कार्यालयाच्या स्थापनेसाठी महावितरणने २६ लाख ३९ हजार रुपये प्रशासकीय खर्चास मंजुरी दिली आहे. पदनिर्मितीच्या खर्चासाठी एक कोटी ९९ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
            महावितरणच्या मुंबई मुख्यालयात महावितरण चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद भादीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल पार पडलेल्या बैठकीत मेहकर विभागीय कार्यालयाच्या स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे. मागील महिन्यात आमदार संजय रायमुलकर यांनी अरविंद भादीकर यांची मुंबई येथे भेट घेऊन मेहकर विभागीय कार्यालयाच्या स्थापनेबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली होती. लोणार येथे २२० के व्ही उपकेंद्राची निविदा प्रक्रिया आहे पूर्ण झाली आहे. तिथे विज उपकेंद्राची उभारणी केली जाणार आहे.
        इकडील चार तालुक्यातील वीज ग्राहकांना प्रत्येक वेळी खामगाव येथे जावे लागत होते. त्यामुळे मेहकर येथे विभागीय कार्यालय स्थापन करण्याची मागणी आमदार संजय रायमुलकर यांनी दीर्घ काळापासून लावून धरली होती. मेहकर विभागीय कार्यालयातून मेहकर ,लोणार, सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्याचा वीज वितरणचा कारभार चालणार आहे. महावितरण खामगाव विभागीय कार्यालया अंतर्गत आता खामगाव, खामगाव ग्रामीण, शेगाव व संग्रामपूर वीज उपविभागीय कार्यालये चालणार असून बुलढाणा उपविभागात बुलढाणा, चिखली, धाड व उदयनगर उपविभागीय कार्यालयांचा कारभार चालणार आहे. नव्या मेहकर विभागीय कार्यालय उभारणीसाठी २६ लाख ३९ हजार रुपयांच्या प्रशासकीय खर्चास मंजुरात देण्यात आली असून मेहकर येथे कार्यकारी अभियंता ,अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता व चार सहाय्यक अभियंता यांच्यासह एकूण ३८ पदे मंजूर करण्यात आली आहेत.
               यात ३६नियमित व दोन बाह्य स्त्रोत अशा ३८ पदे स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे. खामगाव विभागीय कार्यालयात अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना मेहेकर विभागीय कार्यालयात नियुक्ती देऊन समायोजित करण्यात येणार आहे. मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा या चार तालुक्यातील नागरिकांना आता खामगाव येथे जाण्याची गरज पडणार नाही, मेहकर विभागीय कार्यालयातून त्यांना सेवा मिळणार असल्याने जास्त अंतराचा भुर्दंड पडणार नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी आमदार संजय रायमुलकर यांचे अभिनंदन केले आहे. 
          

Post Top Ad

-->