मेहकर. महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी प्रचंड जनसमुदायाच्या रॅलीने शक्तीप्रदर्शन करत आज दि. २८ ऑक्टोबर रोजी मेहकर विधासनसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे उमेदवर खरात यांनी शक्तीप्रदर्शन करीत शहरातून काढलेल्या विराट रॅलीने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. या रॅलीचे येथील स्वातंत्र्य मैदानावर सभेत रूपांतर झाले. त्यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हा प्रमुख आशिष रहाटे, रा.काँ.नेते अँड्.साहेबराव सरदार, काँग्रेसचे अँड्.अनंतराव वानखेडे, शहर प्रमुख किशोर गारोळे, निसार अन्सारी,दिलीप वाघ,रा.काँ.तालुका अध्यक्ष दत्ता घनवट, कलीम खान, दिलीप वाघ, ऍड आकाश घोडे या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर हे होते. तर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सभेला महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
सिद्धार्थ खरात यांना विजयी करा,सर्व जबाबदारी मी घेतो : माजी मंत्री डॉ.शिंगणे,मेहकर. सिद्धार्थ खरात यांना विजयी करा,सर्व जबाबदारी मी घेतो,मेहकर वासियांना सिद्धार्थ खरात यांच्या माध्यमातून कोरा चेहरा दिला आहे. तुम्ही त्यांना विजयी करा पुढची सर्व जबाबदारी मी घेतो अशी ग्वाही माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.ते मेहकर विधानसभा मतदार संघाचे उच्चविद्याविभूषीत सिद्धार्थ खरात यांचा आज उमदेवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीचे सभेत रुपांतर झाल्यानंतर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, मी दोन वर्षे महायुती सोबत होतो. जे ४० आमदार दादा सोबत गेले त्यापैकी मीच एकमेव होतो की मी फक्त जिल्हा बँकेच्या भल्यासाठी तिकडे गेलो होतो. मात्र एक दिवस सुद्धा सुखाने झोपलो नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार तिकडे नाहीत. मेहकरचा इतिहास तुम्हाला बदलायचा आहे. ही संधी आता हुकु देऊ नका. नाहीतर भविष्यात पश्चाताप होईल. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. महिलांना दीड हजार रूपये मिळतात. आमचे सरकार आल्यावर ही योजना बंद तर होणार नाही उलट दीड हजार ऐवजी पाच हजार रुपये देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. उध्दव ठाकरेंच्या सरकारने २ लाख रुपयांपर्यतची कर्जमाफी दिली होती. आताही शेतकरी हवालदिल झाला आहे. कर्ज बाजारी झाला आहे. तेव्हा कर्जमाफी हवी असेल तर महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.
घराघरात मशाल पोहोचवा-प्रा.नरेंद्र खेडेकर,यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर म्हणाले की, सहा महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. आपलाच विजय होईल असे वाटत होते. मात्र यश आले नाही. विजय सोपा नसतो. शेवटपर्यंत लढाई लढावी लागते. येणाऱ्या काळात मतविभाजनाचा मोठा प्रयत्न होईल. धर्म निरपेक्ष विचारांची मते फुटता कामा नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. घराघरात मशालच चिन्ह पोहोचवा. काही पुढारी सेटलमेंट करतील. त्यांच्या कडे लक्ष ठेवा. बाणावर मशालच उपाय आहे. जातीपातीच्या भानगडीत न पडता एकदिलाने मेहनत करा व मशाल विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
मेहकर सोडणार नाही- सिद्धार्थ खरात,मेहकर विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मी मंत्रालयात राहिलो तरी जनतेच्या प्रश्नांची जाण आहे. गावगाडयातला मी माणूस आहे. आतातर राजीनामा सुद्धा दिला आहे. मेहकर मतदार संघाचा नाविन्यपूर्ण विकास करण्यासाठी तुमचे आशीर्वाद मला हवे आहेत. इथे विकासाऐवजी दहशतवाद वाढत आहे. काही झाले तरी मी मेहकर सोडणार नाही, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.
यावेळी ते पुढे म्हणाले की, मी चळवळीतला माणूस आहे. प्रत्येक तरूणाच्या हाताला काम देणे हे माझे कर्तव्य राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी मतदारांना दिला. तसेच यावेळी माजी मंत्री सुबोध सावजी, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर, माजी नगराध्यक्ष कासम गवळी, शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत,रा.काँ.नेते अँड्.साहेबराव सरदार, काँग्रेसचे विधानसभा नेते अँड्.अनंतराव वानखेडे व विद्यार्थीनी पूजा तांगडे यांची सुद्धा भाषणे झाली. यावेळी सभा मंचावर शिवसेना विधानसभा संघटक किसन पाटील, सि.राजा येथील सह संपर्क प्रमुख छगन मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर,माजी सभापती भास्करराव गारोळे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव,रा.काँ.तालुका प्रमुख दत्ता घनवट,माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे,आफताब खान,कलीम खान,शैलेश बावस्कर,निसार अन्सारी,शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख जिजा राठोड, संजीवनी वाघ,पौर्णिमा गवई, दिलीप वाघ,पुरूषोत्तम पडघान,शैलेश सावजी, दीपक मापारी, भुषण मापारी, संजय वडतकर,गजानन खरात, चिपडे, डी.जी.गायकवाड, युवा सेना तालुका अधिकारी आकाश घोडे, रमेश देशमुख, साहेबराव हिवाळे,एन.ए.बळी,संदीप गवई,ऋषी जगताप,संदीप गारोळे सह शिवसेना, काँग्रेस व रा.काँ.पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा प्रमुख प्रा.आशिष रहाटे यांनी केले. संचालन अजिम नवाज राही यांनी केले. तर आभार शहर प्रमुख किशोर गारोळे यांनी मानले.