BULDANA MEHKAR डॉ. ऋतुजा चव्हाणमुळे बिघडू शकते अनेकांचे राजकीय गणित... - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, October 11, 2024

BULDANA MEHKAR डॉ. ऋतुजा चव्हाणमुळे बिघडू शकते अनेकांचे राजकीय गणित...

                                  ताई तुम्ही निवडणूक लढाच जनतेचा आग्रह 

मेहकर.मागील अनेक वर्षांपासून जनतेच्या सतत संपर्कात असलेल्या डॉ. ऋतुजा ताई  यांनी आता राजकारणात प्रवेश केल्याने त्या अनेकांचे राजकीय गणित बिघडवू शकतात. 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदार संघ हा नेहमी चर्चेत असतो, मेहकर  मतदार संघाला शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तर या ठिकाणी शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर हे सलग पंधरा वर्षापासून आमदार आहेत आणि आता ते चौकार मारायच्या स्थितीमध्ये आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना सतत येणार अपयश यामुळे विद्यमान आमदाराला होणारा फायदा लक्षात घेता आता शिवसेना उद्धव ळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून या ठिकाणी उमेदवार देण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून  मिळाली आहे.तर दोन शिवसैनिक समोरासमोर लढतील अशी शक्यता आहे. मात्र हेच राजकीय गणित आता कुठेतरी डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्यामुळे  मेहकर विधानसभचे  राजकीय गणित बिघडणार असल्याची स्थितीत दिसून येत आहेत. कारण ऋंषाक चव्हाण यांचा सहकार क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून  कार्यरत असून सामाजिक कामात सुद्धा त्यांचा खूप मोठा वाटा आहे.सतत जनतेशी संपर्क व सामाजिक कार्यात अग्रेसर भूमिका घेणारे चव्हाण यांची चांगलीच पकड या मतदारसंघात तयार झाली आहे. तर पाठिंबा म्हणून व मार्गदर्शन म्हणून शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर तसेच शेतकरी नेते ज्ञानेश्वर टाले यांचाही संपर्क दांडगा असून यामुळे अनेकांचे राजकीय गणित बिघडविल्याची चर्चा आहे.त्यामुळे मेहकर मतदार संघात  आता अनेकांचे गणित बिघडणार असल्याचे दिसून येते.

डॉ.चव्हाण यांना पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीसाठी कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या डॉ. ऋतुजा चव्हाण ह्या सध्या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी त्यांचे सामाजिक, राजकीय, वैद्यकीय यासह सहकार क्षेत्रातील कार्य लक्षात घेता त्यांना मेहकर विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी ऐन वेळेवर कोणत्याही राजकीय पक्षाकडून संधी मिळू शकते अशी चर्चा मतदारसंघात आहे. तर मतदार संघात एक महिला व उच्चशिक्षित उमेदवार म्हणूनही डॉ. ऋतुजा चव्हाण यांना मतदारांचा पाठिंबा मिळत आहे... 

शेतकरी नेते ज्ञानेश्वर टाले यांचा तगडा जन संपर्क राजकीय अनुभाचा चव्हाण यांना होणार फायदा. शेतकरी संघटनेत तब्बल बारा वर्षापासून कार्यरत असलेले डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांचा जनसंपर्क मेहकर विधानसभा मतदारसंघात तगडा असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करून न्याय मिळवून देणारे टाले यांचा चाहता वर्ग सुध्दा या मेहकर मतदार संघात मोठ्या प्रमाणात आहे यांचा फायदा सुद्धा डॉ.ऋतुजा ताई चव्हाण यांना मतदान स्वरूपात होणार असल्याचे मतदार वर्गातून बोलल्या जात आहे त्यामुळे अनेकांचे राजकीय गणित बिघडणार हे मात्र तेवढेच खरे.....

Post Top Ad

-->