BULDANA महामार्गावरील बायोडिझेल पंपांवर महसूल व पोलीस विभागाची कारवाई; तीन बायोडिझेल पंप सील - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, October 8, 2024

BULDANA महामार्गावरील बायोडिझेल पंपांवर महसूल व पोलीस विभागाची कारवाई; तीन बायोडिझेल पंप सील

बुलडाणा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बायोडिझेल पंपावर महसूल विभागाने सोमवारी (दि. 7) कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झालेल्या कारवाईत फौजी धाबा, कन्हैया हॉटेल व एकता हॉटेलजवळच्या तीन पंपांवर कारवाई करुन सील ठोकले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अवैधरीत्या बायोडिझेल पंप चालविण्यात येत असल्याची  तक्रार प्राप्त झाली. प्राप्त तक्रारीवरुन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशाने मलकापूर येथील महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने दुपारी कारवाई करण्यात आली. यावेळी तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले, पोलिस निरीक्षक गणेश गिरी, पुरवठा निरीक्षक धनश्री हरणे यांच्यासह महसूल व पोलिस विभागाच्या पथकाचा समावेश होता. 

Post Top Ad

-->