बिबी येथे दुसरबीड रोडवर ॲम्बुलन्स व ट्रकचा भीषण अपघात ॲम्बुलन्स चालक ठार सविस्तर वृत्त असे की आज दिनांक3-12-2024 वार रोज मंगळवार ला रात्री ठीक 9वाजता बिबी दुसर बीड रोड पेट्रोल पंपाच्या बाजूला ट्रक व ॲम्बुलन्स चा समोरासमोर अपघात झाला असून त्यामध्ये ॲम्बुलन्स चालक अक्षय उकंडा आडे रा (आईचा तांडा) किनगाव जट्टू ता लोणार जि बुलढाणा जागीच ठार झाला आहे ॲम्बुलन्स बिबी कडून दुसर बीड कडे जात होती तसेच ॲम्बुलन्स वाहक राजेश्वर वाकळे वय वर्ष 30 रा वाशी मुंबई हा गंभीर रित्या जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच परिसरातील सर्व नागरिक बिबी ग्रामीण रुग्णालयाचे 108 चे कर्मचारी डॉ देवानंद फड ॲम्बुलन्स चालक राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत दिली त्यानंतर जखमी वाकळे यांना पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व त्यांचे सर्व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले व त्यांनी वाहतूक सुरळीत केली पुढील तपासणी बिबी पोलीस स्टेशन करीत आहे
आपला विदर्भ live देवानंद सानप