डोणगाव ते मेहकर राज्य महामार्गावर अंदाजे चाळीस वर्षे अनोळखी इसमाचे प्रेत सापडले असून त्या प्रेताचे पंचनामा करून सवेच्छेदनासाठी मेहकर येथे पाठविले आहे.
डोणगाव मेहकर राज्य महामार्गावर नागापूर शिवारातील एका शेताजवळ राज्य महामार्गाच्या कडेला एका 40 वर्षीय इसमाचे प्रेत सापडल्याचे दूरध्वनीद्वारे डोणगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ. संजय धिके, पोलीस कॉ. आनंद चोपडे, गणेश देशमुख हे घटनास्थळी दाखल होऊन त्या प्रेताचा पंचनामा केला. व प्रेत सवविच्छेदनासाठी मेहकर येथे पाठविले