मेहकर. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ खरात हे विधानसभा निवडणूक लढवीत असून त्यांचे प्रचारासाठीचे साहित्य व मॉनिटर सीपीयू हार्दिक मेमरी कार्ड असा तब्बल ४० हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला.ही घटना १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० ते १०.४५ वाजताच्या दरम्यान घडली या घटनेबाबत गजानन भिमराव पलावे यांनी मेहकर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार मेहकर शहरातील पवनसुत नगर येथील गजानन भिमराव पलावे यांनी मेहकर पोलीस स्टेशनला फिर्यादी दिली की, दि. १९ नोहेंबर २०२४ चे रात्री ९.३० वा ते १०.४५ वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने माधव ससाणे रा. सारंगधर नगर, शिक्षक कालनी, मेहकर यांचे मालकीचे जागेत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मेहकर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सिध्दार्थ खरात यांचे प्रचार संबंधाने सुरू केलेले वार रूममधील लिनोवा कंपनीचा मानीटर, असुस कंपनीचा असेम्बल सीपीयु, सीगेट कंपनीची २ टीबी ची हार्डडिस्क, ३२ जीबीचे सॅनडिस्क कंपनीचे कार्ड, युपीएस, नेट राउटर, वेलबर्न कंपनीचे कार्ड रिडर, माउस, कि- बोर्ड, असे एकूण अंदाजे ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरी गेल्याची माहिती मला विनोद गवई यांनी फोन करून दिली, या माहितीवरून मी सदर घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, नमो साहित्य चोरी गेल्याचे दिसून आले. याबाबत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सिध्दार्थ खरात यांना मोबाइल फोनद्वारे साहित्याची चोरी झाल्याची माहिती दिल्याने त्यांनी सदर ठिकाणी येवून खात्री केली. सदरील चोरी ही वाइट हेतुने व खोडसाळपणा केला असून महाविकास आघाडीचे उमेदवार सिध्दार्थ खरात यांच्या प्रचारात अडथळा निर्माण करणेसाठी व संगणकाचे माध्यमातुन मतदारापर्यंत चुकीचा संदेश देण्याकरिता केलेली आहे.अशी तक्रार मेहकर पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून मेकर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.
ड्रोन कॅमेरा द्वारे पाळत व धमकीही
मेहकर लोणार मतदार संघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या मेहकर स्थित घरावर अज्ञात व्यक्तीकडून ड्रोन कॅमेरा द्वारे पाळत ठेवण्यात येत असून मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे. याबाबत सिद्धार्थ खरात यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून न्याय देण्याची मागणी केली होती. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामुळे मतदार संघात खळबळ उडाली असून विरोधकांकडून असा खोडसाळ पणा केला जात असल्यामुळे मात्र मतदार संघातील वातावरण दूषित होत आहे. परिणामी यामुळे अनुचित प्रकार घडण्याची सुद्धा निर्माण झाली असून याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून असा प्रकार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खरात यांनी केली आहे.