SAMRUDDHI समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात पितापूत्र ठार - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, April 11, 2025

SAMRUDDHI समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात पितापूत्र ठार

               वाशीम येथील चंदनशिव परिवारावर काळाचा झाला

 डोगणाव: देवदर्शन करून परत येत असताना चंदनशीव परिवारावर काळाने घाला घातल्याने पितापूत्र जागीच ठार झाले. तर,तीन जण  जखमी झाले. मन सुन्न करणारी घटना ११ एप्रिल रोजी सकाळी ३ वाजताच्यादरम्यान समृद्धी महामार्गावरील डोणगाव गावाजवळ घडली. सदर घटनेत रतन पाटील चंदनशीव (वय ५५)व गोपाल चंदनशीव (वय ३५) असे मृतक पितापुत्राची नावे आहेत. 

प्राप्त माहितीनुसार वाशीम शहरातील माधवनगर लाखाळा परिसरात वास्तव्यास असलेलेले रतन चंदनशिव व गोपाल चंदनशीव हे पित्रापुत्र परिवारासह एम.एच.११ सीक्यू ८५६६ क्रमांकाच्या कारने देवशदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन घेऊन समृद्धी महामार्गाने परत येत असातना एक तासाच्या अंतरावर घर असताना डोगणाव जवळ  समृद्धी महामार्ग चॅनल क्रमांक २६८ जवळकाळाने त्यांच्यावर घाला घातला. समोरच्या आर.जे. २९ जी.बी.२८२० क्रमांकाच्या ट्रकला कारचालकाने जबर धडक दिली.या अपघातात रतन चंदनशिव व गोपाल चंदनशीव हे पितापूत्र जागीच ठार झाले तर,चंदनशीव परिवारातील नववधू पूजा रतन चंदनशिव (वय २९), राणी गोपाल चंदनशिव (वय ३१) अर्चना रतन चंदनशिव (वय ५० ) व चालक शिवाजी इडोळे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.या वेळी महामार्ग पोलीस व डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी  पोचून जखमींना तात्काळ अ‍ँम्ब्युलन्स द्वारे रेफर केले व क्रेनद्वारे वाहन उचलून वाहतूक सुरळीत केली.या वेळी  पोलीस कर्मचारी व क्विक रिस्पॉन्स टीमचे सदस्य उपस्थित होते.

                   जून महिन्यात होते पूजाचे लग्न चंदनशीव परिवाराच्या घरी गंभीर जखमी झालेल्या पूजाचे जून महिन्यात लग्न होत. त्यामुळे सर्व आनंदआनंदी वातावरण होते. लग्नाची तयारीही सुरू होती. अशातच नवरी होणाऱ्या पूजाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी रतन पाटील चंदनशीव हे सह

परिवारासह देवदर्शनाला गेले होते. देवदर्शन घेऊन परत येताच लग्नसोहळयाची तयारी करायची... असे ठरवून घरी निघालेल्या चंदनशीव परिवारावर व सुखी संसाराचे स्वप्न पाहत असताना होणाºया नववधूवर काळाने घाला घातला. समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात नववधू पूजा गंभीर जखमी झाली. तर, तिचे वडील व भावाचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.शोकाकूळ वातावरणात त्यांच्यावर वाशीम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post Top Ad

-->