Gram Panchayat Sarpanch मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, April 15, 2025

Gram Panchayat Sarpanch मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला सोडत

बुलडाणा, दि. 15 : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार मेहकर तालुक्यातील 65 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान मेहकर तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसिल कार्यालय, मेहकर येथील निवडणूक विभाग येथे सोडत काढण्यासाठी सभा आयोजित करण्यात आले आहे.  तसेच अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती. नागरीकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गा अंतर्गत स्त्रियांकरिता आरक्षण सोडत दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता सुरु होणार असुन उपविभाग मेहकर अंतर्गत मेहकर तालुक्याचे स्त्रियांकरिता आरक्षण सोडत ठिक दुपारी 2 वाजता जिल्हानियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे निश्चित करण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडती करीता मेहकर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत मेहकर तहसिलदार निलेश मडके यांनी कळविले आहे.

Post Top Ad

-->