WASHIM,RISOD शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून एक लाख रुपयाचे नुकसान - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, May 11, 2025

WASHIM,RISOD शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून एक लाख रुपयाचे नुकसान


वाकद शिवारातील घटना.शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी

रिसोड-:साहित्य जळून खाक होऊन यामध्ये एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना काल दिनांक 10 मे रोजी संध्याकाळी सहा वाजता रिसोड तालुक्यातील वाकद शेत शिवारात घडली. आग लागल्याची माहिती मिळताच शेतकरी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीने एवढे उग्ररूप धारण केले होते की शेतकऱ्यांना सदर गोठा वाचण्यात अपयश आले. याबाबत माहिती अशी की रिसोड तालुक्यातील वाकद शेत शिवारामध्ये गजानन पैठणकर या शेतकऱ्याची शेती असून यामध्ये टिन पत्राच्या बांधलेल्या या कोठ्यामध्ये पैठणकर यांनी शेती उपयोगी ठेवलेले साहित्य ज्यामध्ये स्प्रिंकलर पाइप, तोट्या, ताटपत्री पाण्याची टाकी अन्य साहित्य व कोट्याचे टिन पत्रे जळून यामध्ये एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.आग कशी लागली याबात मात्र कळू शकले नाही. सदर आगीमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य तो मोबदला  देण्यात यावा अशी मागणी गजानन पैठणकर यांनी केली आहे.

Post Top Ad

-->