डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
बुलढाणा: कायद्याने गुन्हा असताना सुद्धा इतक्ये मोठे धाडस दाखवून नकोसे असलेल्यास बाळाचे गर्भपात करून देण्याचा धक्कादायक प्रकार.? डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले शेलगाव देशमुख भागात.? अत्यंत गंभीर प्रकाराने एकच खळबळ उडाली असून या प्रकाराबाबत मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सुनिता देवराव हिवसे यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून सदर फिर्यादीवरून आरोपी गजानन विठ्ठल वैद्य रा. माझोड ता. सेनगाव जि. हिंगोली यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये डोणगाव पोलीस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार मेहकर ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक सुनीता देवराव हिवसे वय ५५ यांनी तक्रार दिली की, जिल्हा शल्यचीक्तीस विभाग बुलढाण PCPNDT विभागस गोपणीय रित्या तक्रार प्राप्त झाली की, मेहकर व डोणगांव विभागात गर्भवती महिलांच्या पोटातील बाळाचे गर्भलींग निदान करतात. प्राप्त माहितीनुसार १७ एप्रिल PCPNDT विभागाला लिगल काॅन्सीलर अड्. वंदना तायडे मोबाइल फोन वरुन तक्रारदार यांना गोपनीय माहिती मिळाली की,१७ एप्रिल रोजी डोणगांव परिसरात गर्भलींगदान करण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने PCPNDT विभागाने एक केस तयार केली व नंतर संतोष नारायन माळोदे, अड्. वंदना तायडे, ज्ञानेश्वर मुळे, व पंच गजानन रघुनाथ शेवाळेसह आम्ही मेहकर येथे आलो व नंतर आम्ही (डमी केस) घेऊन कुकसा फाटा येथे आलो व तेथे गोपणीय तक्रार भेटला व तेथे एम.एच.४९ ए.एस.६९६६ या क्रमांकाच्या गाडी पाठलाग केला व त्यांना शेलगाव देशमुख पर्यंत आलो, असता व सदर गाडी परत आली व सदर गाडी आम्ही थांबवीली. त्यामध्ये दोन महिला आल्या होत्या. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही गजानन विठ्ठल वैद्य रा. माझोड ता. सेनगाव जि.हिंगोली यांनी आम्हाला शेलागाव देशमुख येथेच फिरवा फिरव केली व एका महिलेने २८ हजार रुपये गजानन विठ्ठल वैद्य याच्याकडे दिले व म्हणाला की मीच डाॅक्टर आहे व दुसरे डाॅक्टर गर्भलींग निदान करतो व मी नंतर गर्भपात करतो. व तुम्ही सदर रक्कम डाॅक्टरला द्या नंतर पैसे गजानन विठ्ठल वैदय याने घेतले होते. तेथुन गजानन विठ्ठल वैद्य याच्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये 1.NULIFE Tripal Safety चे चार ग्लोज नग, ब्लड कलेक्शन बाटल ५ नग, DYNAPAR AQ इंजेक्शन सीरीज १० नग, डीस्पोव्हन सीरींज २.५ ML.२ नग, नगदी २०० रुपयांच्या ४५ नोटा ९ हजार रुपये व नगदी ५०० रुपयांच्या ३८ नोटा १९ हजार रुपये असे एकुण २८ हजार रुपये आरोपी गजानन विठ्ठल वैदय याच्या पॅन्टचे खिशा मधुन मिळुन आले.सदर आरोपी गजानन विठ्ठल वैद्य याने गर्भलींगदान केल्यानंतर तुम्हाला अपेक्षीत नसलेल गर्भ मी गर्भपात करुन देइल असे म्हणुन महिलांची फसवणुक केली आहे. सदर व्यक्ती हा वैद्यकीय अधिकारी नसतांना वैद्यकीय अधिकारी भासउन फसवणूक केली आहे. तरी सदर आरोपीवर कायदेशीर कार्यवाही करावी अशी फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून डोणगाव पोलिस स्टेशनचे पोहेका संजय घिके यांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक गाढवे करीत आहेत.