Risoda रिसोडमध्ये दहावीचा विद्यार्थी बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, February 13, 2026

Risoda रिसोडमध्ये दहावीचा विद्यार्थी बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू


रिसोडमध्ये दहावीचा विद्यार्थी बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरूरिसोड येथील  विद्यार्थी क्लासला गेला आणि परत आलाच नसल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. 

रिसोड (दि. १३ फेब्रुवारी २०२६) – शहरातील सांतोष रोठोड यांचा मुलगा १६ वर्षीय विद्यार्थी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रिसोड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. Video link १४ वर्षांपासून बंद असलेल्या मेहकरमधील कोट्यवधींच्या इमारतीचं अखेर रहस्य उघड!

फिर्यादीनुसार, साहिल (वय १६) हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून तो खासगी शिकवणीसाठी जात होता. दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता तो शिकवणीसाठी घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक व मित्रपरिवाराकडे चौकशी करून शोध घेतला; तरीही त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

साहिल याची उंची अंदाजे ५ फूट, रंग गोरा, केस काळे असून अंगात निळ्या रंगाचा शर्ट व नाईट पॅन्ट असा पेहराव होता, अशी माहिती तक्रारीत नमूद आहे. त्याच्याकडे मोबाईल फोन नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मंगेश वसंतराव मालवे (ब.क्र. ५१५) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच विविध ठिकाणी शोधकार्य सुरू आहे.

दरम्यान, संबंधित विद्यार्थ्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास रिसोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संपर्क, 7350206643

Post Top Ad

-->