Crime news मेहकरमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा; हॉटेल अँड लॉजिंगमधून एक आरोपी अटकेत - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, March 16, 2026

Crime news मेहकरमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा; हॉटेल अँड लॉजिंगमधून एक आरोपी अटकेत


           मेहकरमध्ये देहव्यापारावर पोलिसांचा छापा; 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात पोलिसांनी देहव्यापाराच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली आहे. मेहकर बायपास रस्त्यावरील एकांत हॉटेल अँड लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अवैध देहव्यापारावर पोलिसांनी छापा टाकत एका आरोपीला अटक केली असून दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.

मेहकर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, मेहकर बायपास रस्त्यावरील एकांत हॉटेल अँड लॉजिंगमध्ये देहव्यापार सुरू आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. त्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकत ही कारवाई केली.

या कारवाईत प्रमोद धनसिंग पवार, रा. बिबी ता. लोणार याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध मेहकर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल, पोहेकॉ. लक्ष्मण कटक, प्रभाकर शिवणकर, शिवानंद केदार, पोकॉ. मोहम्मद परसुवाले, करीम शहा, शिवाजी चिम, विनांद फुफाटे, मपोकॉ. आम्रपाली सरकटे तसेच होमगार्ड सचिन इंगळे, संनिल काटकर आणि उमेश देबाजे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.दरम्यान, शहरात अशा प्रकारचे अवैध प्रकार आढळल्यास नागरिकांनी त्वरित मेहकर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मेहकर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post Top Ad

-->