वर्धा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कारमधील आई आणि लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.कार चालवणाऱ्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने समोरील कंटेनरला कारने मागून जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.
हा अपघात समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडोर चॅनेज क्रमांक ३९/९०० जवळ घडला.ठाण्याहून नागपूरकडे प्रवास सुरू असतानाच हा काळाचा घाला घडला.
अपघातात आईचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.मात्र उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच मुलाचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार बाजूला करण्यात आली आणि काही वेळातच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दीर्घ प्रवासात वाहन चालवताना झोप आणि थकवा टाळण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे.
.jpg)
.jpg)