जिल्ह्यात 104 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर
तिघांचा मृत्यु ; 24 जणांना रुग्णालयातून सुट्टी
यवतमाळ, दि. 9 : जिल्ह्यात आज (दि. 9) नव्याने 104 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले 24 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज (दि. 9) मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 64 वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील शेनंद येथील 50 वर्षीय पुरुष आणि दिग्रस शहरातील शिवाजी नगर येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 104 जणांमध्ये 64 पुरुष आणि 40 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 13 पुरुष व 10 महिला, पांढरकवडा शहरातील 21 पुरुष व 14 महिला, झरी शहरातील चार पुरुष, उमरखेड शहरातील चार पुरुष व चार महिला, उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील एक पुरुष, पुसद शहरातील आठ पुरुष व चार महिला, पुसद तालुक्यातील कवाडीपूर येथील एक पुरुष व दोन महिला, हिवलानी तलाव येथील दोन पुरुष, दारव्हा शहरातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील एक पुरुष, आर्णि शहरातील एक पुरुष व एक महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व दोन महिला, वणी तालुक्यातील राजूरा येथील एक महिला, नेर शहरातील एक पुरुष आणि नेर तालुक्यातील घारफळ येथील चार पुरुष व दोन महिला पॉझेटिव्ह आल्या आहेत.
जिल्ह्यात रविवारी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 24 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 416 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1598 झाली आहे. यापैकी 1138 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 44 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 128 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 31 नमुने पाठविले असून सुरवातीपासून आतापर्यंत 26414 नमुने पाठविले आहे. यापैकी 23793 प्राप्त तर 2621 अप्राप्त आहेत. तसेच 22195 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.