भंडारा जिल्ह्यात आज कोरोनाचे 30 रुग्ण 16 रुग्णांना डिस्चार्ज
पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 695
बरे झालेले रुग्ण 421
क्रियाशील रुग्ण 264
आज एक मृत्यू
एकूण मृत्यू 010
भंडारा दि. 20 (जिमाका) जिल्ह्यात आज 16 कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत तर नव्या 30 रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 04, साकोली 00, लाखांदूर 01, तुमसर 06, मोहाडी 09, पवनी 03 व लाखनी तालुक्यातील 07 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 421 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 695 झाली असून 264 क्रियाशील रुग्ण आहेत. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 10 झाली आहे.
आज 20 ऑगस्ट रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 163 व्यक्ती भरती असून 1023 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5064 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 168 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 4896 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.