गोहगांव दांदडे येथून अपंगाच्या खात्यात आलेले पैसे घेऊन त्या पैशातून औषधी खरेदी करण्याचा इराद्याने आलेल्या युवकाच्या हाती खात्यात पैसे नसल्याने निराशा आली मात्र त्याला बँक मॅनेजरने मदत दिली
अपंग,निराधार,श्रावण बाळ अश्या योजनेतून मिळणाऱ्या पैशावर कित्येक गरीब गर्जुनचे विविध कामे आधारलेले असतात अश्यातच या लोकांना हा पैसा खात्यात कधी येईल या विषयी उत्सुकता लागलेली असते मात्र निकडीच्या वेळी पैसे मिळाले नाहीतर त्यांना खूप समस्यांना सामोरे जावे लागते अशीच एक घटना गोहगाव दांदडे येथील दोन्ही पायांनी अपंग युवक बँकेत आला मात्र पैसे नसल्याने निराश झालेल्या युवकाला बँक मॅनेजरने औषधी साठी लागणारे पैसे देऊन मानवतेचे दर्शन दिले.
गोहंगाव दांदडे येथील शेक सलमान हा युवाक दोन्ही पायांनी अपंग असून तीन चाकी सायकलने तो डोणगांव येथे भारतीय स्टेट बँकेत अपंगांची सहाय्यता राशी खात्यात जमा झाली किव्हा नाही हे पाहण्या साठी आला असता त्याच्या खात्यात पैसे आले नाहीत हे त्याला कळाले अश्यातच पुन्हा ६ किमी सायकलने जाऊन नंतर पैसे घेऊन औषधी आणावी लागेल ही चित्र त्याच्या डोळ्या समोर तरंगले आणि तो निराश झाला बँकेतून बाहेर पडणार तोच त्यावर बँक मॅनेजरची नजर पडली त्यांनी त्याच्या जवळ जाऊन विचारले व अपंगांने त्यांना आपली व्यथा सांगितली की मला मिळणाऱ्या पैशातून औषधी घ्यायची होती मात्र खात्यात पैसे नाही तेव्हा औषधी कितीची हे विचारून बँक मॅनेजर अमूल नाफडे मदत केली तर अपंग युवकाने सुद्धा जेवढी औषधीची किंमत आहे तेव्हढेच पैसे घेऊन त्याहून जास्त पैसे नकोत म्हणून फक्त औषधी पुरतेच पैसे स्वीकारले एकीकडे सरकारी बँक म्हणजे तेथील येणारे अनुभव सर्वांना माहितीच असतात मात्र अश्यातच डोणगाव येथील भारतीय स्टेट बँक मध्ये आलेला अनुभव वेगळं काही सांगून जातो.