स्टेट बँक ऑफ इंडिया येथे एका युवकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
प्रतिनिधी:- सुनील फुलारी
कारंजा : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे एका युवकाने केला आत्महत्येचा प्रयत्न दिनांक 5 ऑगस्ट रोजी कारंजा शहर येथील भारतीय स्टेट बँक शाखा कारंजा च्या बँके मधील मॅनेजरचे केबिनमध्ये जाऊन तन नाशक फवारणी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला
सविस्तर माहिती अशी की कारंजा शहर येथील रहिवाशी निरंजन धनद्रव्य यांनी काही महिन्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेमध्ये मुद्रा लोन साठी काही कागदपत्रे बँकेमध्ये दिले होते परंतु निरंजन यांना बँकेमधून कुठल्याही प्रकारचे लोन दिले जात नव्हते त्यामुळे त्यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कारंज्याच्या बँकेमध्ये जाऊन मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन तन नाशक औषध पिऊन स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असे निरंजन धनाद्रव्ये यांनी आमच्या प्रतिनिधीने सांगितले तन नाशक औषधी पीत असतानाचे लक्षात येतात मॅनेजर यांनी तात्काळ काही लोकांच्या मदतीने त्यांना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले पुढील तपास कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।