दसरा सण घरातच साजरा करावा; प्रशासनाचे आवाहन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, October 24, 2020

दसरा सण घरातच साजरा करावा; प्रशासनाचे आवाहन


बुलडाणा,(जिमाका) दि.24:
दरवर्षीप्रामाणे येत्या रविवार, 25 ऑक्टोंबर रोजी विजयादशमी अर्थात दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. मात्र यावर्षी दसरा सणाच्या उत्साहाला कोरोनो विषाणू संसर्गाच्या काळजीची किनार आहे. संपूर्ण जगृ, देश, राज्य कोरोना संसर्गाच्या सावटाखाली वावरत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी दसरा हा सण आपल्या घरातच साजरा करावा. आपल्यामुळे इतरांना किंवा इतरांमुळे आपल्या कुटूंबाला संक्रमणाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुणीही सोने देण्यास कुठेही जावू नये. कोरोना संसर्ग रोखणे आपल्य हातात आहे. त्यामुळे प्रत्येकाने देशकार्य म्हणून कोरोना संसर्गाच्या शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. लहान मुले, ज्येष्ठ नागरीक यांना सोने देणे व घेण्याचा आग्रह धरू नये. थोडा संयम बाळगला तर, पुढील काळात येणारा प्रत्येक सण उत्साहाने साजरा करता येईल. तरी दसरा हा सण घरातच साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Post Top Ad

-->