बुलडाणा जिमाका प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1233 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1112 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 121 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 119 व रॅपीड टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1009 तर रॅपिड टेस्टमधील 103 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1112 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : नांदुरा शहर :6, नांदुरा तालुका : माळेगाव गोंड 4, शेंबा 1, तांदुळवाडी 1, चिखली शहर: 11, चिखली तालुका: सावरगाव डुकरे 1, दे. राजा शहर : 10, दे राजा तालुका : असोला जहागीर 8, निवडुंगा 1, मेहकर तालुका: हिवरा आश्रम 2, कासारखेड 1, मोहणा 1, कल्याणा 1, मेहकर शहर : 9, खामगाव शहर : 7, खामगाव तालुका : अंबोडा 1, मोताळा तालुका: पिंपरी गवळी 1, तळणी 4, मोताळा शहर: 1, शेगाव शहर : 9, शेगाव तालुका : सगोडा 1, मनसगाव 1, बुलडाणा शहर: 13, बुलडाणा तालुका : कोलवड 1, सिंदखेड राजा शहर: 4, सिंदखेड राजा तालुका: पांगरखेड 3, कि. राजा 1, दुसरबीड 1, जागदरी 3, जळ पिंपळगाव 1, लोणार शहर: 1, मलकापूर शहर: 9, नांदुरा शहर: 2, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 121 रूग्ण आढळले आहे.
तसेच आज 91 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 4, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 1, अपंग विद्यालय 6, नांदुरा :26, चिखली :3, शेगाव :3, सिंदखेड राजा : 14, दे. राजा : 5, मोताळा :2, जळगाव जामोद: 11, लोणार :1, मलकापूर: 4, मेहकर :9, संग्रामपुर :1.तसेच आजपर्यंत 74233 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 10694 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 10694 आहे.
तसेच 2389 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 74333 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 11206 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 10694 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 378 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 134 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.