387 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह
बुलडाणा,(जिमाका) दि. 14 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 504 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 387 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 110 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 39 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 261 तर रॅपिड टेस्टमधील 126 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 387 अहवाल निगेटीव्ह आहेत.
46 रूग्णांना मिळाली सुट्टी
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : 27, चिखली तालुका : हातनी 2, कोलारा 1, अंत्रिकोळी 1, अमडापुर 3, अंचरवाडी 2, खंडाळा 2, भोकरवडी 1, जांभोरा 1, पाटोदा 1, भालगाव 2, दे. राजा शहर : 9, दे. राजा तालुका : सिनगाव जहागीर 2, डोढरा 1, गिरोली बु 1, सिं. राजा तालुका : साखरखर्डा 3, सिंदखेड राजा शहर : 1, लोणार तालुका : अंजनी खु 1, बुलडाणा तालुका : अजीसपुर 1, बुलडाणा शहर : 24, जळगांव जामोद तालुका : वाडी 1, खामगांव शहर : 10, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : मोरखेड 1, लासुरा 1, मोताळा तालुका : मूर्ती 1, खामगाव तालुका : लखनवाडा खू 2, सुटाला 1, हिवरखेड खू 1, नांदुरा शहर :2, नांदुरा तालुका : पिंप्री अढाव 1, मूळ पत्ता धावडा ता. भोकरदन जि. जालना 1, जळगाव 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 91 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे मोताळा येथील 63 वर्षीय पुरुष रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच आज 46 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : खामगांव : 2, चिखली : 5, दे. राजा : 12, बुलडाणा : अपंग विद्यालय 13, लोणार : 1, शेगांव : 5, नांदुरा : 1, सिंदखेड राजा : 1, मलकापूर : 5, जळगाव जामोद : 1. तसेच आजपर्यंत 115021 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14115 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 14115 आहे.
तसेच 887 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 115021 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14815 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 14115 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 523 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 177 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.