जालना ते देऊळगावराजा मार्गावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत आज रविवार सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कार कोसळली. या अपघातात मायलेकीचा मृत्यू झाला आहे, तर तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या विहिरीत दोन दिवसांपूर्वी बीड येथील कार कोसळली होती. त्यात दोन युवकांचा मृत्यू झाला होता.
विषयी अधिक माहिती अशी की, जालना-देऊळगावराजा मार्गावर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कार कोसळली. या अपघातग्रस्त कारमध्ये वाशीम जिल्ह्यातील लोक असल्याचे समोर आले आहे.जालणा
ते औरंगाबाद येथील काम आटोपून सकाळी परत निघाले होते. एका ट्रकने त्यांच्या कारला हुलकावणी दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यापासून दहा फूट असणाऱ्या विहिरीत कोसळली. क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढण्यात आली.
ही विहिर जालन्यालगत असलेल्या जामवाडी शिवारात आहे. या अपघातात वाशीम येथील आरती गोपाळ फादडे (वय 30) आणि तिच्या चार वर्षीय माही या मुलीचा बुडून मृत्यू झाला. गोपाळ विठ्ठल फादडे (35), वेदिका फादडे (दीड) आणि जय वानखेडे (17) या तिघांना ग्रामस्थांनी सुखरूपपणे बाहेर काढले.