दोन दुचाकींची समोरासमोर धडकेत आई सह मुलगा जखमी
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर औरंगाबाद राज्य महामार्गावरील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नागापूर जवळ असलेल्या वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन तीन जन जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता दरम्यान घडली
प्रथम उपचारासाठी दाखल डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र
घटनेत डोणगाव येथील सुनिल विठोबा परमाळे हे आपली दुचाकी क्रमांक MH, 28 BJ 4609 मेहकर वरून डोणगाव येथे येत होते तर शिरपूर वरून मेहकरचा दिसेने पवण रमेश सोळंकी व त्यांची आई दुचाकी क्रमांक MH 28 AH 9471 ने जात असताना दोघांची समोरासमोर धडक होऊन तीन जन जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशनचे विकास राऊत ए एस साय आशोक नरोटे, सायगल अंभोरे सह कर्मचारी पोहुचून प्रथम उपचारासाठी डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर त्यांन मेहकर येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून पुढील तपास मात्र डोणगाव पोलिस करीत आहेत