२४ तासांत ११ मृत्यू; १,२७६ नवीन रुग्ण (Nagpur-covid) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, March 9, 2021

२४ तासांत ११ मृत्यू; १,२७६ नवीन रुग्ण (Nagpur-covid)


(छायाचित्रे संग्रहित )

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत   पुन्हा ११ करोनाबाधितांचा मृत्यू झाला तर १,२७६ नवीन रुग्णांची भर पडली. नवीन मृत्यू व रुग्णांमुळे जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या करोना बळींची संख्या ४४०० पार तर आजपर्यंतच्या रुग्णांची संख्याही १.५९ लाखापुढे गेली आहे.

नवीन रुग्णांमध्ये शहरातील १ हजार ३७, ग्रामीण २३६, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण १ हजार २७६ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार ८७९, ग्रामीण ३१ हजार १६२, ग्रामीण ९६४ अशी एकूण १ लाख ५९ हजार ५ रुग्णांवर पोहोचली

आहे. दिवसभऱ्यात शहरात ७, ग्रामीण १, जिल्ह्य़ाबाहेरील ३ असे एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ८३७, ग्रामीण ७८२, जिल्ह्य़ाबाहेरील ७८२ अशी एकूण ४ हजार ४०१ रुग्णांवर पोहोचली आहे.  मागच्या २४ तासांत  शहरात ८१६, ग्रामीण २२३ असे एकूण १ हजार ३९ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख १५ हजार ९१७, ग्रामीण २७ हजार ६११ अशी एकूण १ लाख ४३ हजार ५२८ रुग्णांवर पोहोचली आहे.  सोमवारी करोनामुक्तांचे प्रमाण ९०.२७ टक्के नोंदवले गेले.

सकारात्मक अहवालाचे प्रमाण १३.६४ टक्के

जिल्ह्य़ात सातत्याने करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही २४ तासांमध्ये शहरात केवळ ५ हजार ५३०, ग्रामीण १ हजार ८४ अशा एकूण ६ हजार ६१४  चाचण्या झाल्या. ही संख्या रविवारी जिल्ह्य़ात ९ हजार ३५२ होती. त्यातील सोमवारी आढळलेले १,२७६ बाधित बघता सकारात्मक अहवालाचे प्रमाण १३.६४ टक्के नोंदवले गेले.

गृह विलगीकरणाचे उल्लंघन केल्यास गुन्हा

गृहविलगीकरणाचे उल्लंघन केल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. गृह विलगीकरणातील काही  बाधित  वैद्यकीय कारणांशिवाय बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आहेत.  यातून संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांच्या हातावर शिक्का मारण्याचे आदेश सुध्दा देण्यात आले आहेत.

Post Top Ad

-->