( छायाचित्र )
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापनकोविड साथरोग पार्श्वभूमी
बुलडाणा-: (जिमाका) दि.20: सध्या राज्यात कोविड - 19 साथरोग संसर्गाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने शासनाने जाहिर निर्बंध जाहीर केले आहे. खरिप हंगाम 2021 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठयाबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या अडचणीचे निवारण करण्याकरीता राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभाग जिल्हा परिषद येथे नियंत्रण कक्ष स्थापीत करण्यात आला आहे.
सदर नियंत्रण कक्षाशी 24 तास संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वनी क्रमांक 8275340540, 8830152010 तसेच कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002334000 संपर्क साधावा. सोबत अडचण किंवा तक्रार dsaobuldana.qc @gmail.com, ado.buldana@yahoo.in ई मेल वर पाठवावे किंवा नोंदवता येणार आहे. तसेच ई -मेल वर येणाऱ्या अडचणी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकिंग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवतांना आपले नाव, पत्ता संपर्क क्रमांक थोडक्यात किंवा सदर माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा छायाचित्र व्हॉट्सॲप किंवा ई - मेलवर पाठवल्यास आपल्या तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप वापर करणे शक्य नसेल त्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनी वर तोंडी तक्रार नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.