२४ तासांत ६० मृत्यू
(छायाचित्रे संग्रहित)नागपूर : जिल्ह्यात करोना मृत्यूचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. १६ सप्टेंबर २०२० रोजी नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ६० मृत्यू नोंदवले गेले होते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत गुरुवारी २४ तासांत पुन्हा ६० मृत्यू झाले. याशिवाय दिवसभरात जिल्ह्यात ३ हजार ६३० नवीन रुग्णांची भर पडली.
गेल्यावर्षी २०२० मध्ये नागपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात करोनाचे सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले होते. १० सप्टेंबर २०२० मध्ये जिल्ह्यात ५८ तर १६ सप्टेंबरला ६० मृत्यूची नोंद झाली होती. दुसऱ्या लाटेत आज गुरुवारी दिवसभरात ६० मृत्यू झाले. त्यात शहरातील ३५, ग्रामीण २१, जिल्ह्याबाहेरील ४ मृत्यूंचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील गेल्यावर्षीपासून आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार २८३, ग्रामीण १ हजार १७, जिल्ह्याबाहेरील ८५८ अशी एकूण ५ हजार १५८ रुग्णांवर पोहचली आहे. दिवसभरात शहरात २ हजार ४८१, ग्रामीण १ हजार १४५, जिल्ह्याबाहेरील ४ असे एकूण ३ हजार ६३९ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या १ लाख ८० हजार ४१, ग्रामीण ४८ हजार ५८७, जिल्ह्याबाहेरील १ हजार ४० अशी एकूण २ लाख २९ हजार ६६८ रुग्णांवर पोहचली आहे. दिवसभरात शहरात २ हजार २३१, ग्रामीण ६९७ असे एकूण २ हजार ९२८ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या १ लाख ४८ हजार ९६२, ग्रामीण ३५ हजार ५७५ अशी एकूण १ लाख ८४ हजार ५३७ व्यक्तींवर पोहचली आहे.
३,६३० नवीन रुग्णांची भर विदर्भात करोनाचे ९० बळी
विदर्भात २४ तासांत करोनाचे तब्बल ९० मृत्यू झाले असून सर्वाधिक ६० मृत्यू हे केवळ नागपूर जिल्ह्यातील आहेत. तर दिवसभरात विदर्भात ७ हजार ४७३ नवीन रुग्णांची भर पडली. शहरात दिवसभरात ३५, ग्रामीण २१, जिल्ह्याबाहेरील ४ अशा एकूण ६० रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूंच्या तुलनेत नागपुरातील मृत्यूचे प्रमाण हे ६६.६६ टक्के आहे. तर नागपूर जिल्ह्यात दिवसभरात ३ हजार ६३० नवीन रुग्ण आढळले. बुलढाण्यात २४ तासांत ९ मृत्यू तर ७१० नवीन रुग्ण आढळले. यवतमाळला ५ मृत्यू व ६५४ रुग्ण आढळले. वर्धेत ३ मृत्यू तर २८५ रुग्ण आढळले. अमरावतीत ३ मृत्यू तर २८८ रुग्ण आढळले. चंद्रपूरला ३ मृत्यू व ३५३ रुग्ण आढळले. गडचिरोलीत एकही मृत्यू नाही पण ७२ रुग्ण आढळले. वाशीमला १ मृत्यू तर ३२३ रुग्ण आढळले. अकोल्यात ५ मृत्यू व २५८ रुग्ण आढळले. भंडाऱ्यात १ मृत्यू तर ७३३ रुग्ण आढळले. गोंदियात मृत्यू नाही, पण १६७ रुग्ण आढळले.
सकारात्मक अहवालाचे प्रमाण २२.५६ टक्के
शहरात दिवसभरात ११ हजार ६६४, ग्रामीण ६ हजार २१४ असे एकूण १७ हजार ८७८ चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल शुक्रवारी अपेक्षित आहेत. परंतु बुधवारी तपासलेल्या १६ हजार ८६ नमुन्यांमध्ये ३ हजार ६३० रुग्णांना करोना असल्याचे निदान झाल्याने सकारात्मक अहवालाचे प्रमाण २२.५६ टक्के नोंदवले गेले.
सक्रिय रुग्ण ४० हजारांच्या उंबरठ्यावर
शहरात २८ हजार ५३८, ग्रामीण ११ हजार ४३५ असे एकूण ३९ हजार ९३७ उपचाराधीन रुग्ण आहेत. यापैकी गंभीर ५ हजार २२९ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.