शिवसेनेच्या नीता दिलीपराव देशमुख यांची अविरोध निवड
मेहकर पंचायत समिति सभापती पदी आज शिवसेनेच्या नीता दिलीपराव देशमुख यांची अविरोध निवड झाली आहे मावळते सभापती निंबाजी पांडव यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आज सभापती पदासाठी बैठक घेण्यात आली. पं.स.मध्ये शिवसेना ९,काँग्रेस २ भाजप १ असे पक्षीय बलाबल आहे. आज मावळते सभापती निंबाजी पांडव व नीता दिलीपराव देशमुख यांनी अर्ज भरला होता. मात्र शेवटी निंबाजी पांडव यांनी अर्ज मागे घेतला व नीता देशमुख यांची अविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. संजय गरकळ, सहाय्यक म्हणून गटविकास अधिकारी आशीष पवार यांनी काम पाहिले. यावेळी शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गाडेकर,तालुका प्रमुख सुरेश वाळूकर उपस्थित होते.शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख, माजी जि.प.विरोधी पक्ष नेते दिलीपबापू देशमुख यांच्या त्या पत्नी आ